Join us

‘इश्कबाज’ मालिकेत हाय व्होल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2017 14:10 IST

'इश्कबाज' मालिकेच्या आगामी भागात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.या मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिकेतील रंगत आणखी वाढणार ...

'इश्कबाज' मालिकेच्या आगामी भागात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.या मालिकेत विविध ट्विस्ट आणि टर्न्समुळे मालिकेतील रंगत आणखी वाढणार आहे. या मालिकेत शिवाय आणि अनिका यांच्यात खटके उडतात. त्यावेळी आपल्या जीवनात आपण खूप पुढे निघून गेल्याचं अनिका शिवायला सांगते. त्याचवेळी रुद्र (लिनिश मट्टू) आणि ओमकारा आपल्या वहिनीच्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीला घेऊ येतात. ओबेरॉय मेन्शनमध्ये या व्यक्तीची अचानक एंट्री झाल्याने शिवायला मोठा धक्काच बसतो. ती व्यक्ती आणि अनिका यांच्यात चांगलीच केमिस्ट्री जुळू लागते. तो अनिकाशी फ्लर्ट करण्याचाही प्रयत्न करतो. या व्यक्तीची आणि अनिकाची ही जवळीक शिवायला चांगलीच खटकते. दोघं जवळ येत असल्याचं पाहून शिवायच्या मनात द्वेष निर्माण होतो.तिकडे विक्रमही अनिकाच्या आणखी जवळ येण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे रागिनीसुद्धा अनिकाला ओबेरॉय मेन्शनमधून बाहेर काढण्याचं कारस्थान रचत असते. यांत आता रागिनीला यश येणार का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तिकडे लवकरात लवकर अनिकाचं लग्न लावण्याची तयारीही सुरु आहे. त्यामुळे अनिका आणि शिवाय आता कायमस्वरुपी एकमेकांपासून दूर जाणार का? की दोघं एकमेकांपासून दूर जाऊन शत्रूचा सामना करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. काही दिवसांपासून मालिकेचे निर्माते शिवाय आणि अनिका यांच्याऐवजी गौरी आणि ओमकारा यांच्यावर अधिक लक्ष केंद्रीत करुन आहेत. गौरी आणि ओमकारा यांची केमिस्ट्री आणि रोमान्स रसिकांना चांगलीच भावतेय. त्यामुळे दोघांवरील सीन्समुळे मालिकेला रसिकांची चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे ओबेरॉय बंधूंच्या जीवनात आता काय काय घडणार आणि या मालिकेच्या कथेला निर्माते किती काळ रेटून नेतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.