Join us  

विनोदवीर कुशल बद्रिकेच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो पाहिलंत का?, जाणून घ्या कोणकोण आहे त्याच्या कुटुंबात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 7:00 AM

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात.

सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीत उत्सुक असतात. ते कुठे रहातात, त्यांच्याकडे कोणती गाडी आहे, कुटुंबात कोणकोण लोक आहेत. आज आम्ही तुम्हाला मराठी सिनेइंडस्ट्रीतील विनोदवीर कुशल बद्रिकेच्या कुटुंबाविषयी सांगणार आहोत..

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी शो चला हवा येऊ द्या महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे. कुशल बद्रिकेने आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनात घर केले आहे. कोणतंही स्कीट सादर करताना स्टेजवरील एनर्जी, आपल्या सहकलाकारासह असलेलं त्याचं ट्युनिंग यामुळे कुशल रसिकांना खळखळून हसवतो. कुशल सोशल मीडियावरही तितकाच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपल्या रसिकांशी कनेक्ट होत संवाद साधतो. सोशल मीडियावर आपल्या खासगी आयुष्यातील क्षण तो रसिकांसह शेअर करतो.आपले फोटो आणि  व्हिडीओ तो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. अनेकवेळा कुशल आपल्या कुटुंबासोबतचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर करत असतो.

कुशल, सुनैना आणि त्यांचा मुलगा असं त्यांचं छोटं कुटुंब आहे. कुशलसाठी त्याचं कुटुंब हेच जग असून त्यांच्यातच तो सुख शोधतो.अनेकवेळाला कुशल मुलासोबत स्वत अभ्यास करताना, तर कधी फॅमिली पिकनीकला जातानाचे फोटो शेअर करत असतो.  कुशलची पत्नी सुनैना कथ्थक नृत्यांगणा आहे. त्याची पत्नी ही दिसायला अतिशय सुंदर असून मुलगा देखील खूपच गोड आहे.

 

टॅग्स :कुशल बद्रिकेचला हवा येऊ द्याटिव्ही कलाकार