Join us

तुमच्या लाडक्या गौरीचा हा सूरेल आणि प्रसन्न अंदाज तुम्ही पाहिलाय का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 14:10 IST

 छोट्या पडद्यावरील गौरी घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या शिववर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याचवेळी  आपल्या कुटुंबीयांवर तितकाच जीव असणारी गौरी ...

 छोट्या पडद्यावरील गौरी घराघरात प्रसिद्ध आहे. आपल्या शिववर जीवापाड प्रेम करणारी आणि त्याचवेळी  आपल्या कुटुंबीयांवर तितकाच जीव असणारी गौरी रसिकांना चांगलीच भावते. काहे दिया परदेस या मालिकेतील या गौरीचं घरोघरी उदाहरण दिलं जातं. शिवबरोबर लग्न होण्याआधी आणि लग्न झाल्यानंतर संयमी, प्रेमळ आणि सा-यांशी आपुलकीनं वागणा-या गौरीनं रसिकांची मनं जिंकली आहेत. ही गौरी म्हणजे अभिनेत्री सायली संजीव चंदसरकार. मात्र गौरी सायली संजीव नावानं प्रसिद्ध आहे. 'काहे दिया परदेस' ही तिची पहिलीच मालिका. पहिल्याच मालिकेतील गौरी या भूमिकेच्या माध्यमातून रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवण्यात सायली यशस्वी ठरली आहे. मात्र सध्या गौरी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आहेत. या चर्चेचं कारण म्हणजे तिचा एक फोटो. अभिनेत्री म्हटलं की तिचे हॉट, सेक्सी अंदाजातले फोटो, ग्लॅमरस लूकचे फोटो अधिकाधिक चर्चेत असतात. मात्र सायलीचा हा फोटो या सगळ्या गोष्टीला अपवाद ठरला आहे. या फोटोत ना गौरीनं तोकडे कपडे घातलेत ना अंगप्रदर्शन केलंय. मग तरी हा फोटो खास आहे. कारण या फोटोत सायलीची नवी अदा रसिकांना पाहायला मिळतेय. या फोटोत सायली चक्क बासरी वाजताना पाहायला मिळतेय. अभिनय कौशल्याने रसिकांवर मोहिनी घालणा-या सायलीला सूरांचीही तितकीच जाण आहे हे या फोटोत पाहायला मिळतंय. सायली एक मोठी बासरी वाजवत असून तिचा प्रसन्न चेहरा कुणालाही घायाळ करेल. त्यामुळे तुमची लाडकी गौरी सूरांचीही तितकीच पक्की आहे असं या फोटोवरुन दिसून येत आहे. सायली संजीवची ही काहे दिया परदेस ही पहिलीच मालिका आहे. मात्र या मालिकेत काम करण्याआधी तिनं बंगाली आणि तमिळ सिनेमातही काम केलंय. याशिवाय पोलीस लाईन, अलिबाग बायपास अशा सिनेमांमध्येही तिनं अभिनयाची जादू दाखवली होती. राज्यशास्त्रात पदवी घेतलेल्या सायलीला याच विषयात पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. अभिनेत्री बनली नसती तर कदाचित राजकीय विश्लेषक बनली असते असं सायलीनं सांगितलं आहे. मात्र सायलीचा सोशल मीडियावर बासरी वाजवतानाचा फोटो पाहून तिच्यासमोर आणखी एका करियरचा पर्याय आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. सायली नवी सूरेल इनिंग सुरु शकेल हे, हा फोटो पाहून कुणीही सांगू शकेल.