श्वेता मेहंदळे ही अभिनेता राहुल मेहंदळे याची पत्नी आहे. या गोजिरवाण्या घरात या मालिकेत राहुल आणि श्वेता एकत्र झळकले होते. या मालिकेत काम करत असतानाच दोघांमध्ये आधी मैत्री आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर श्वेता आणि राहुल यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. राहुल आणि श्वेता यांच्या जीवनात आर्य नावाचा त्यांचा मुलगाही आहे. माझ्या नव-याची बायको या मालिकेत गंभीर आणि पुरुषांवर तिरस्कार करणा-या महिलेची भूमिका श्वेता साकारत असली तरी रिअल लाइफमध्ये ती मनमौजी आणि धम्माल मस्ती करणारी आहे.
पती राहुल, मुलासह श्वेता धम्माल करत असते. नातेवाईक आणि मित्रांसहसुद्धा ती फुल्ल ऑन एन्जॉय करते. याच धम्माल मस्तीचे फोटो श्वेता वेळोवेळी शेअर करत असते. माझ्या नव-याची बायको या मालिकेआधी विविध मालिका आणि सिनेमांमध्ये श्वेतानं अभिनय केला आहे. नायक, या गोजिरवाण्या घरात, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला या मालिकांमध्ये श्वेतानं भूमिका साकारल्या आहेत. याशिवाय धूम 2 धमाल, पाच नार एक बेजार, सगळं करुन भागलं, असा मी तसा मी, जावईबापू जिंदाबाद अशा सिनेमांमध्येही श्वेताने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.