Marathi Actor Saurabh Gokhale: छोट्या पडद्यावरील सर्वाधिक बघितला जाणारा शो म्हणजे बिग बॉस. अलिकडेच महिनाभरापूर्वी बिग बॉस मराठीचं सहावं पर्व दणक्यात सुरु झालं. या शोची सर्वत्र तुफान चर्चा आहे. जसजसे दिवस सरत चालले आहेत तसाच हा शो आणखी रंगतदार होत चालला आहे. बिग बॉसच्या प्रत्येक सीझनला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या प्रत्येक सीझनमध्ये सेलिब्रिटींनी देखील सहभाग घेतला आहे. अशातच नुकताच अभिनेता सौरभ गोखलेने या शोबद्दल आपलं मत मांडलं आहे.
सध्या अभिनेता सौरभ गोखले अमर विश्वास या सीरिजमुळे प्रचंड चर्चेत आहे. शिवाय रंगभूमीवर त्याचं सुभेदार गेस्ट हाऊस हे नाटक जोरदार सुरु आहे. नुकताच सौरभ गोखलेने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला. यादरम्यान, अभिनेत्याला तुला बिग बॉससाठी कधी विचारणा झाली आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देत तो म्हणाला, "बिग बॉसची ऑफर मला अनेकवेळा आली आहे. पण, मला स्वत: ला कधीच असं वाटलं नाही की, मी त्या शोचा भाग व्हावं किंवा तिथे जावं. कारण, मला असं वाटतं तो पूर्णपणे माईंडगेम झोनमधला तो प्रकार आहे. त्यासाठी एक वेगळी मानसिकता आणि तसा स्वभाव असणं गरजेचं आहे जे कदाचित माझ्याकडे नाही."
त्यानंतर मग पुढे अभिनेता म्हणाला,"समोरच्याने केवळ टीआरपीसाठी मला चार गोष्टी बोलून उकसवायचा प्रयत्न केला तर यावर मी खूप विचित्र रिअॅक्ट होऊ शकतो. मी वैयक्तिक आयुष्यात कसा आहे. हे माझ्या घरच्यांना माहित आहे आणि माझ्या मित्रांना माहित आहे. मला ते काही चव्हाट्यावर आणण्याची गरज वाटत नाही. त्यामुळे मला तिकडे जाणं पटत नाही. मला कुकिंग करायला खूप आवडतं. तसंच वाचन करायला, फिरायला,ट्रेकिंग करायला भयंकर आवडतं.जर एखाद्या माणसाला आपण एकाच जागेवर १०० दिवस बांधून ठेवलं तर तो तसाच वागणार आहे. त्या झोनमधला मी नाही, त्यामुळे मला अशा ठिकाणी जाणं जमणार नाही." असं सौरभने यावेळी सांगितलं.
Web Summary : Actor Saurabh Gokhale disclosed he declined multiple 'Bigg Boss' offers. He feels the show is a mind game, requiring a specific mindset he lacks. Gokhale prefers privacy and fears being provoked for TRP, stating his personal life is for family, not public display. He enjoys cooking, reading, and trekking.
Web Summary : अभिनेता सौरभ गोखले ने खुलासा किया कि उन्होंने कई 'बिग बॉस' के प्रस्तावों को ठुकरा दिया। उनका मानना है कि यह शो एक माइंड गेम है, जिसके लिए एक विशिष्ट मानसिकता की आवश्यकता होती है, जो उनमें नहीं है। गोखले निजता पसंद करते हैं और टीआरपी के लिए उकसाए जाने से डरते हैं, उनका कहना है कि उनका निजी जीवन परिवार के लिए है, सार्वजनिक प्रदर्शन के लिए नहीं। उन्हें खाना बनाना, पढ़ना और ट्रेकिंग करना पसंद है।