सुनयाना लागली कामाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2016 17:26 IST
सुनयाना फौजदार गेल्या काही महिन्यांपासून मालिकांपासून दूर होती. पण आता ती एक रिश्ता साझेदारी का या मालिकेत प्रमुख भूमिका ...
सुनयाना लागली कामाला
सुनयाना फौजदार गेल्या काही महिन्यांपासून मालिकांपासून दूर होती. पण आता ती एक रिश्ता साझेदारी का या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. राजश्री प्रोडक्शनच्या बॅनरमधून बाहेर पडून कविता बडजात्या आता स्वतंत्रपणे निर्मिती करणार आहेत. एक रिश्ता साझेदारी ही कविता यांची पहिली मालिका असून या मालिकेचे चित्रीकरण नुकतेच सुरू झाले आहेत. या मालिकेच्या काही भागांचे चित्रीकरण जैसलमेर येथे होणार आहे. या मालिकेत किंक्षुक वैद्यही प्रमुख भूमिका साकारणार आहे.