एण्ड टीव्हीवरील मालिका 'हप्पू की उलटन पलटन'ने दरोगा हप्पू सिंग (योगेश त्रिपाठी), त्याची पत्नी दबंग दुल्हनिया राजेश (कामना पाठक) आणि हट्टी आई कटोरी अम्मा (हिमानी शिवपुरी) यांचे घरगुती गैरसमज व विनोदी अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. या मालिकेला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हप्पूच्या विनोदी चुका, राजेशचे विलक्षण प्रत्युत्तर आणि अम्माचा बुलंद अंदाज यांसह हे त्रिकूट प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
कामना पाठक म्हणाली, ''मालिका 'हप्पू की उलटन पलटन'ला इतरांपेक्षा खास बनवणारी बाब म्हणजे महिलांचे स्थान. हास्य व विनोदासह ज्याप्रमाणे महिला पात्रांना महत्त्व देण्यात आले आहे ते अत्यंत सुंदर आहे. राजेश ही जुडले जाता येईल अशी भूमिका आहे आणि ती एक प्रबळ महिला आहे, जी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यासोबत इतर कर्तव्ये देखील लीलया पार पाडते. मला या भूमिकेबाबत वर्णन करण्यात आले तेव्हाच मला समजले की ही भूमिका हिट ठरेल आणि मी त्वरित ही भूमिका साकारण्याला होकार दिला. आज, मला देशभरातील प्रेक्षकांकडून कौतुक मिळत असलेल्या या मालिकेचा भाग असण्याचा अभिमान वाटत आहे. प्रेक्षक अत्यंत दयाळू आहेत व पाठिंबा देत आहेत. मी आजीवन त्यांचे मनोरंजन करण्यास उत्सुक आहे.''