Join us
Daily Top 2Weekly Top 5

​‘डोन्ट वरी Be Happy’ ची हाफ सेन्चुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 21:19 IST

स्पृहा जोशी आणि उमेश कामत ही आॅन स्क्रिन जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. मालिका आणि सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविल्यानंतर ...

स्पृहा जोशी आणि उमेश कामत ही आॅन स्क्रिन जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. मालिका आणि सिनेमामध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखविल्यानंतर ही जोडी रंगभूमिवर अवतरली. स्पृहा आणि उमेश ह्या दमदार जोडीच्या ​‘डोन्ट वरी Be Happy’ या नाटकाने ५० वा प्रयोग म्हणजेच हिरक महोत्सवी प्रयोगांक पूर्ण केला आहे. मिहीर राजदा लिखीत या नाटकाचं दिग्दर्शन अद्वैत दादरकर यांनी केले आहे. सोनल प्रोडक्शन निर्मित या नाटकाच्या निमित्ताने स्पृहा - उमेश जोडीची केमिस्ट्री पुन्हा रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे. आणि हे नाटक अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलयं.