Join us
Daily Top 2Weekly Top 5

हेलीने स्वतःलाच दिले एक खास गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2016 18:25 IST

स्वरागिणी फेम स्वरा अर्थात हेली शहाची यंदाची दिवाळी खूप खास ठरली. दिवाळी म्हटले की फराळ, फटाके खूप सारी धमाल ...

स्वरागिणी फेम स्वरा अर्थात हेली शहाची यंदाची दिवाळी खूप खास ठरली. दिवाळी म्हटले की फराळ, फटाके खूप सारी धमाल तर झालीच, मात्र या सणात मिळणारे गिफ्टसही तितकचे स्पेशल असतात. असेच एक खास गिफ्ट हेली शहाला अर्थात स्वराला मिळाले आहेत. आता हेलीला असे काय खास गिफ्ट मिळाले असणार आणि ते गिफ्ट कोणाकडून मिळाले असावे असे अनेक प्रश्न निर्माण होतो. मात्र एक मजेशीर गोष्ट आहे, हेलीला एक डायमंड रिंग गिफ्ट म्हणून मिळाली आहे. विशेष म्हणजे हे गिफ्ट कोणा दुस-या तिस-या कडून मिळाले नसून तिनेच स्वतःसाठी ही रिंग दिवाळी स्पेशल गिफ्ट स्वत:लाचा गिफ्ट केली आहे. गिफ्टस नेहमी दुसऱ्यांकडून मिळणे गरजेचे नाही. कोणाकडून अपेक्षा का बरे करावी. स्वतःच्या आवडीच्या वस्तू आपण स्वतः ला गिफ्ट करू शकतो. असेही हेलीने म्हटेल आहे. इतकेच नसून तिने तिच्या कुटुंबीयांसाठी त्यांच्या आवडीच्या वस्तू गिफ्ट केल्या आहेत. स्वतःच्या आवडीनिवडी बरोबरच तिने तिच्या कुटुंबीयांच्याही आवडीनिवडीचा विचार करत स्वतःलाच गिफ्ट देण्याच ट्रेंडही सेट केला असे म्हणायला हरकत नाही.