Join us

गुरमीतने केले देबिनाला प्रपोझ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2016 12:14 IST

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची आॅन स्क्रिन केमिस्ट्री आपल्याला ...

गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे छोट्या पडद्यावरचे एक क्यूट कपल मानले जाते. या दोघांची आॅन स्क्रिन केमिस्ट्री आपल्याला अनेक मालिकांमध्ये, रिअॅलिटी शोमध्ये पाहायला मिळाली होती. गुरमीत आणि देबिनाच्या लग्नाला अनेक वर्षं झाली आहेत. पण लग्नाच्या अनेक वर्षांनंतर गुरमितने पुन्हा एकदा देबिनाला प्रपोज केले आहे. देबिना ही बंगाली असल्याने नुकतेच गुरमीतने तिला बंगालीत प्रपोज करतानाचा व्हिडिओ इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.