द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये आता हे दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2017 11:16 IST
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात अक्षय कुमार सुपर जजची भूमिका साकारत असून या कार्यक्रमात मल्लिका दुआ, झाकित ...
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये आता हे दिसणार परीक्षकाच्या भूमिकेत
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात अक्षय कुमार सुपर जजची भूमिका साकारत असून या कार्यक्रमात मल्लिका दुआ, झाकित खान आणि हुसैन दलाल प्रेक्षकांना परीक्षकाच्या भूमिकेत दिसत आहेत. पण हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला म्हणावा तितका टिआरपी मिळालेला नाही. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजच्या या आधीच्या सगळ्या सिझनना प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. या सिझनने राजू श्रीवास्तव, कपिल शर्मा, एहसान कुरेशी यांसारखे विनोदवीर इंडस्ट्रीला मिळून दिले आहेत. पण द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनला तितकासा टिआरपी मिळत नसल्याने या कार्यक्रमात आता काही बदल करण्यात येणार आहेत. आता या कार्यक्रमात श्रेयस तळपदे आणि साजिद खान परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. मल्लिका दुआ, झाकित खान आणि हुसैन दलाल यांना या कार्यक्रमातून डच्चू देण्यात आला आहे.द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला लवकरच श्रेयस तळपदे आणि साजिद खान सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमात लवकरच शेवटच्या १२ स्पर्धकांची निवड करण्यात येणार आहे आणि या १२ मधून सर्वोत्कृष्ट विनोदवीराची निवड अक्षय कुमार, श्रेयस तळपदे आणि साजिद खान करणार आहेत.अक्षय कुमार, श्रेयस आणि साजिद खान यांची केमिस्ट्री ही खऱ्या आयुष्यात खूप चांगली असल्याने प्रेक्षकांना ती या कार्यक्रमातही पाहायला मिळणार आहे. साजिद खानच्या हे बेबी आणि हाऊसफुल या चित्रपटात अक्षय झळकला होता. तसेच श्रेयस आणि अक्षयने देखील चित्रपटात एकत्र काम केले आहे. या तिघांच्या केमिस्ट्रीविषयी साजिद खान सांगतो, द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमातील स्पर्धक हे खूप टायलेंटेड आहेत. अक्षय आणि श्रेयस हे मला माझ्या भावासारखेच आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासोबत माझे नाते खूपच चांगले आहे. आम्ही कुठेही एकत्र आलो की आम्ही हसतच असतो. त्यामुळे येथे देखील आम्ही सगळे खूप आनंद घेणार आहोत. अक्षयची कॉमिक टायमिंग खूप चांगली असल्याने या कार्यक्रमासाठी अक्षय हा सगळ्यात चांगला सुपर जज आहे. Also Read : सुहाग या चित्रपटात आजचा हा प्रसिद्ध दिग्दर्शक बनला होता अक्षय कुमारचा बॉडी डबल... ओळखा पाहू कोण आहे तो दिग्दर्शक?