Join us

गोविंदाचे कुटुंब कपिलच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2016 16:14 IST

द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी पाहायला मिळतात. कपिलच्या शोमध्ये यावेळी गोविंदा येणार आहे. गोविंदा या शोमध्ये एकटा ...

द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलिब्रेटी पाहायला मिळतात. कपिलच्या शोमध्ये यावेळी गोविंदा येणार आहे. गोविंदा या शोमध्ये एकटा येणार नसून तो सहकुटुंब येणार आहे. गोविंदाची पत्नी सुनिता आहुजा ही नेहमीच कॅमऱ्यापासून दूर असते. कोणत्याही फिल्मी पार्टीतही तिला पाहायला मिळत नाही. पण ती कपिल शर्मा शोला हजेरी लावणार आहे. तसेच गोविंदाची मुलगी टिनाही या शोमध्ये गोविंदासोबत येणार आहे. गोविंदाच्या चित्रपटांसोबत गोविंदाच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही या भागात प्रेक्षकांना जाणून घ्यायला मिळणार आहे.