Join us  

Devoleena Bhattacharjee: 'गोपी बहू' लग्नबंधनात अडकणार ? हळदीचे फोटो पाहून चाहते संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 10:21 AM

साथ निभाना साथिया मालिकेतली कोकीला बेनची लाडकी सून गोपी म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Devoleena Bhattacharjee:  साथ निभाना साथिया (Sath Nibhana Saathiya) मालिकेतली गोपी बहू आठवते. हो तीच कोकीला बेनची लाडकी सून गोपी म्हणजेच देवोलीना भट्टाचार्जी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. गोपी बहू लग्न करतेय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. देवोलीनाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले हळदीचे फोटो बघून चाहत्यांना प्रश्न पडला आहे. 

देवोलीना भट्टाचार्जी साथ निभाना साथिया मधून लोकप्रिय झाली. तिला सगळे गोपी बहू म्हणूनच ओळखू लागले. मालिकेनंतर देवोलीना बिग बॉस मध्येही सहभागी झाली होती. आता तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्ट बघून देवोलीना लग्न करतेय अशी शंका येतेय. देवोलीनााने हळदीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. पिवळ्या रंगाचा ड्रेस घआलून ती हळदीत रंगलेली दिसते. तसोच तिचा बेस्ट फ्रेंड विशाल सिंग तिला हळद लावताना दिसत आहे. मात्र ही लग्नाचीच तयारी आहे का हे अजुनही तिने अधिकृतरित्या स्पष्ट केले नाही. त्यामुळे ही कोणती प्रमोशनल अॅक्टिव्हिटी तर नाही ना असाही प्रश्न पडतो.

देवोलीनाने ब्रायडल लुकमध्ये आणखी एक फोटो पोस्ट केला होता. रब से जिसको मांगा तु वो सिला है, फिलींग ब्लेस्ड असे तिने कॅप्शन लिहिले होते. तेव्हापासूनच तिच्या लग्नाची चर्चा सुरु झाली. 

सोशल मीडियावर देवोलीनाचे फोटो, व्हिडिओ बघून चाहते संभ्रमात पडले आहेत. देवोलीनाचा नवरा नक्की कोण आहे, ती खरंच लग्न करत आहे का असे प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत. 

टॅग्स :देवोलिना भट्टाचार्जीहिंदीस्टार प्लसलग्नव्हायरल फोटोज्सोशल मीडिया