Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरंभ या मालिकेच्या सेटला देण्यात आला आहे सोन्याचा मुलामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2017 14:54 IST

आरंभ या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. या मालिकेत ...

आरंभ या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. या मालिकेद्वारे ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहेत. या मालिकेत रजनीश दुग्गल, दाक्षिणात्य अभिनेत्री कार्तिका नायर यांच्या प्रमुख भूमिका आहे आणि विशेष म्हणजे बाहुबली 2 चे लेखक एस. राजामौली ही मालिका सादर करत असून या मालिकेत प्रेक्षकांना आर्य आणि द्रविड संस्कृतीमधला संघर्ष पाहायला मिळणार आहे. या मालिकेची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांना या मालिकेविषयी चांगलीच उत्सुकता आहे. या मालिकेच्या चित्रीकरणात काहीही कमतरता राहू नये यासाठी या मालिकेची टीम प्रयत्न करत आहे. या मालिकेचा सेट भव्य दिसावा यासाठी या मालिकेच्या सेटला अस्सल सोन्याचा मुलामा देण्यात आला असल्याची सध्या जोरदार चर्चा आहे. यामुळे या मालिकेच्या सेटची किंमत कित्येक कोटींच्या घरात आहे.या मालिकेत कार्तिका नायर द्रविडांची राणी देवसेनेची भूमिका साकारत आहे. तिचे राज्य असलेल्या द्रविडीगामचा संपूर्ण सेट सोन्याने मढवला गेला असल्याचे म्हटले जात आहे. या सेटवरच्या सगळ्या सिंहासनांवर मौल्यवान खडे आणि रत्ने बसवण्यात आली आहेत. तसेच राजदरबारातील विशाल स्तंभावर हत्तीची चित्रे कोरली आहेत. या स्तंभानादेखील सोन्याचे पाणी देण्यात आले आहे. तसेच राजसिंहासन, खुर्च्या, काही स्तंभ, मुख्य प्रवेशद्वार यावर अस्सल सोन्याचा मुलामा चढवण्यात आला आहे. या मालिकेत वापरण्यात येणारी शाही तलवारदेखील सोन्याची बनवण्यात आली आहे. तसेच शाही दालनाच्या द्वारांनाही सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. हा सेट खरा आणि अत्यंत आलिशान दिसण्यासाठी त्यावर प्रचंड पैसा खर्च करण्यात आला आहे.