Join us

​गीता फोगट आणि मोनिका डोगरा यांची खतरो के खिलाडीमुळे जमली मैत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2017 17:18 IST

खतरो के खिलाडी हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील एकाहून एक भयंकर स्टंट प्रेक्षकांना प्रचंड आवडत ...

खतरो के खिलाडी हा कार्यक्रम प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातील एकाहून एक भयंकर स्टंट प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. सगळेच स्पर्धक स्टंट खूपच चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिवसभर भयानक आणि आव्हानात्मक स्टंट करणे हे स्पर्धकांसाठी खूप कठीण आहे. त्यामुळे आपली एनर्जी वाढवण्यासाठी ते वेगवेगळे प्रयोग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खतरो के खिलाडी या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत आहे. गीता फोगट आतंरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रसिद्ध बॉक्सर आहे. तिने आपल्या देशाला आतापर्यंत अनेक पदके मिळवून दिली आहेत. आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला दंगल हा चित्रपट देखील तिच्याच आयुष्यावर बेतला आहे. गीता सध्या खतरों के खिलाडीमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ती खऱ्या आयुष्यात अतिशय लाजाळू असून ती पटकन कोणाशीही बोलत नाही. पण तरीही तिची मोनिका डोगरा आणि शिबानी दांडेकर यांच्यासोबत खूप चांगली मैत्री जमली आहे. चित्रीकरण सुरू नसतानाही त्या दोघींसोबत ती वेळ घालवत असल्याचे पाहायला मिळते. गीता ही नेहमी हिंदी किंवा हरयाणी भाषेत बोलते तर मोनिका आणि शिबानी या इंग्रजी भाषेतच बोलतात. त्यांच्यात संवाद साधताना भाषेची अडचण येत असली तरी त्यांची खूपच चांगली गट्टी जमली आहे. गीता मोनिकाला फिटनेस ट्रेनिंगसाठी मदत करते तर मोनिका गीताचा स्टायलिश मेकओव्हर करते. मोनिका आणि गीता या खतरों के खिलाडी या कार्यक्रमात एकमेकांच्या स्पर्धक असल्या तरी खऱ्या आयुष्यात त्या एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी बनल्या आहेत. Must Read : खतरो के खिलाडीमध्ये मनवीर गुजर बनला मोनिका डोगराचा टिचर