Join us  

गौतमी देशपांडेचा नवा लूक पाहिलात का ?, सौंदर्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 5:06 PM

'माझा होशील ना या' मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

'माझा होशील ना या' मालिकेमुळे गौतमी देशपांडेला चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे. या मालिकेत गौतमी साकारत असलेली सई बिराजदारची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. माझा होशील ना या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळताना दिसतेय.. गौतमी सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. गौतमी इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस आणि स्टनिंग लूकमधील फोटो शेअर करत प्रेक्षकांनी वाहवा मिळवत असते. सोशल मीडियावर देखील गौतमीचं मोठं फॅन फॉलोविंग आहे.. तिच्या प्रत्येक पोस्टची चर्चा पाहायला मिळते..नुकताच गौतमीने आपल्या नवा हेअर कट मधला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या नव्या हेअर कटमध्ये गौतमी खूपच ग्लॅमरस दिसतेय. गौतमीच्या चाहत्यांनी ही तिचा हा न्यू लूक आवडला आहे. 

. बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी  एक उत्तम गायिका आहे. अनेक वेळा ती गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. गौतमीला गाण्याचा वारसा तिच्या आजीकडून मिळाला आहे.

टॅग्स :गौतमी देशपांडे