‘चंद्रकांता’मध्ये गौरव खन्ना बनला ‘शोले’तील ‘वीरू’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 18:10 IST
‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेत नायक राजपुत्र वीरेन्द्रसिंह ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता गौरव खन्ना लवकरच ‘शोले’ चित्रपटातील ‘वीरू’ ही ...
‘चंद्रकांता’मध्ये गौरव खन्ना बनला ‘शोले’तील ‘वीरू’!
‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ मालिकेत नायक राजपुत्र वीरेन्द्रसिंह ही व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता गौरव खन्ना लवकरच ‘शोले’ चित्रपटातील ‘वीरू’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. या मालिकेतील एका प्रसंगात गौरव खन्नाला दोरीने लोंबकळत ठेवल्याचे दाखविण्यात आले आहे. शिवदत्तला (अंकित अरोरा) टिलिस्मिक विश्वात प्रवेश करायचा असल्याने त्याला त्याची सांकेतिक किल्ली हवी असते. तिची माहिती वीरेन्द्रसिंहाकडून जाणून घेण्यासाठी तो त्याचा छळ करीत त्याला चाबकाने फटके मारीत असतो. तेव्हा बसंती (हेमा मालिनी) ही शोले चित्रपटात जशी वीरूच्या मदतीला धावली होती, तशी चंद्रकांता (कृतिका कामरा) वीरेन्द्रसिंहच्या मदतीला धावून येते. “या प्रसंगाचं चित्रीकरण सुरू होतं, त्या दिवशी सूर्य चांगलाच तळपत होता आणि ऊन भाजत होतं. माझे खांदे खरोखरचखूपच ताणले गेले होते. चाबूक मुलायम होता, तरीही त्याचे काही फटके माझ्या हातांवर बसलेच आणि त्यामुळे माझ्या हातांवर पुढील काही दिवस वळ उठले होते. माझे हात ज्या प्रकारे बांधले होते, त्यामुळे सर्वांनाच तेव्हा शोले चित्रपटातल्या अशाच प्रसंगाची आठवण येत होती. पण इतका सगळा त्रास सहन करून प्रसंग दिग्दर्शकाच्या मनासारखा उतरल्याचं समाधान मला वाटतं,” असे गौरवने सांगितले. ही मालिका अॅक्शनप्रसंगांनी खच्चून भरलेली असून साधारण एक-दोन दिवसांत कृतिका आणि गौरव यांना स्टंट प्रसंग साकारावेच लागतात. त्यांनी जितके प्रसंग साकारले आहेत, ते पाहता या दोन कलाकारांना आता एखाद्या अॅक्शन चित्रपटात भूमिका करण्यास हरकत नसावी!