Join us
Daily Top 2Weekly Top 5

​'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये फुल टू धमाल परफॉर्मन्सेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 12:47 IST

झी युवा वाहिनीवरील डान्स महाराष्ट्र डान्स हा पॉप्युलर डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या रिअॅलिटी शोला ...

झी युवा वाहिनीवरील डान्स महाराष्ट्र डान्स हा पॉप्युलर डान्स रिअॅलिटी शो प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत आहे. या रिअॅलिटी शोला संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. नामवंत कलाकार परीक्षकाच्या भूमिकेत असलेल्या या रिअॅलिटी शो ला प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरले आहे. प्रत्येक एपिसोडमधील उत्कृष्ट परफॉर्मन्सेस आणि स्पर्धकांसमोर असलेलं चॅलेंज प्रेक्षकांची शो बद्दलची उत्कंठा वाढवत आहे. आगामी एपिसोड्समध्ये डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या मंचावर स्पर्धक विविध डान्सफॉर्म्स सादर करून प्रेक्षकांना थक्क करणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या यंदाच्या भागात वेगवेगळ्या शैलीतील उत्कृष्ट परफॉर्मन्सेस प्रेक्षक पाहू शकणार आहेत. ‘पवन टाक’ पॉपिंग हा लोकप्रिय डान्स सादर करताना दिसणार आहे तर ‘स्मृती डान्स अॅकेडमी’ फ्री स्टाईल फोक डान्स सादर करून सर्वांचे डोळे दिपविणार आहेत. ‘यश काप्ता’ तांडव डान्स प्रकार सादर करणार आहे. इतकेच नाही तर ‘सुजिन शेट्टी’ आणि ‘अनिरुद्ध पवार’ फ्री स्टाईल या डान्स फॉर्मवर थिरकणार असून सादर होणाऱ्या इतर डान्स फॉर्म्समध्ये लॅटिन बॉलिवूड, रोबोटिक्स, कथ्थक आणि असे अनेक डान्स फॉर्म्स प्रेक्षक पाहू शकणार आहेत. डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमाच्या यशाविषयी बोलताना परीक्षक सिद्धार्थ जाधव सांगतो, "डान्स महाराष्ट्र डान्स या रिऍलिटी शोचे विजेतेपद जिंकण्यासाठी तरुण आणि उत्साही स्पर्धक येऊन आमच्या समोर परफॉर्म करतात आणि त्या सर्वांच्या मेहनतींना आम्ही नेहमीच दाद देतो. आमच्या या शोमध्ये इतके गुणवान स्पर्धक आहेत की त्यांचे परीक्षण करणे अवघड होत आहे. आम्ही सातत्याने स्पर्धकांना ते जसे आहेत त्यापेक्षा जास्त चांगले परफॉर्म करावे म्हणून प्रोत्साहन देतो आणि त्यांनी सुद्धा आम्हाला आता पर्यंत निराश केलेले नाही.”डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात सिद्धार्थ जाधव, आदित्य सरपोतदार आणि फुलवा खामकर परीक्षकाची भूमिका साकारत आहेत. त्यांनी वेगवेगळ्या शहरांमध्ये येऊन स्पर्धकांचे ऑडिशन घेतले होते. तसेच त्यांना प्रोत्साहन दिले होते. Also Read : ​'डान्स महाराष्ट्र डान्स'मध्ये व्हॅलेंटाईन डेच सेलिब्रेशन