Join us  

कॉटनच्या साडी अन् मोहून टाकणारा चाफा; समृद्धी केळकरचा 'हा' व्हिडीओ एकदा नक्की पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2023 11:28 AM

Samruddhi kelkar: समृद्धीच्या लूकची नेटकऱ्यांमध्ये प्रचंड चर्चा रंगली आहे.

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'फुलाला सुगंध मातीचा'. या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री समृद्धी केळकर (samruddhi kelkar) घराघरात पोहोचली. त्यामुळे समृद्धी लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कलाविश्वात सक्रीय असलेली समृद्धी सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. यात बऱ्याचदा तिच्या फोटोशूट वा व्हिडीओची चर्चा रंगत असते.

अलिकडेच समृद्धीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती कमालीची सुंदर दिसत असून तिच्या मनमोहक अदांनी नेटकऱ्यांना घायाळ केलं आहे.'लाल इश्क ..' असं कॅप्शन देत तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने कॉटनची लाल रंगाची साडी नेसली आहे. सोबतच या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला लाल इश्क हे गाणं सुरु आहे.

दरम्यान, समृद्धीच्या या व्हिडीओवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट केल्या आहेत. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. समृद्धी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक नृत्यांगनादेखील आहे. तिने कथ्थकमध्ये अलंकाराची पदवी घेतली आहे. फुलाला सुगंध मातीचा या मालिकेपूर्वी तिने लक्ष्मी सदैव मंगलम, पुढचं पाऊल, लेक माझी लाडकी, ढोलकीच्या तालावर या मालिका, कार्यक्रमात काम केलं आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटी