फ्रेंडशिप करायला हरकत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:04 IST
करणसिंग ग्रोव्हरच्या आयुष्यात जेनिफर विंगेट आल्यानंतर श्रद्धा निगम या आपल्या पत्नीला त्याने घटस्फोट दिला. करणच्या घटस्फोटानंतर काहीच दिवसांत करण ...
फ्रेंडशिप करायला हरकत नाही
करणसिंग ग्रोव्हरच्या आयुष्यात जेनिफर विंगेट आल्यानंतर श्रद्धा निगम या आपल्या पत्नीला त्याने घटस्फोट दिला. करणच्या घटस्फोटानंतर काहीच दिवसांत करण आणि जेनिफरने लग्न केले. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी करणने जेनिफरला घटस्फोट देऊन तो बिपाशा बासूसोबत विवाहबंधनात अडकला. बिपाशा आणि करणच्या नात्यामुळे जेनिफरला चांगलाच धक्का बसला होता. पण आता ती पूर्णपणे सावरली असून बेहद या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ती सांगते, "माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनांमुळे मला खूप काही शिकायला मिळाले. करणच्या लग्नानंतर माझा आणि त्याचा काहीच संपर्क नाहीये. पण त्याच्यासोबत मैत्री करण्यास खरे तर माझी काहीही हरकत नाही. कोणत्याही व्यक्तीमध्ये चांगले आणि वाईट असे दोन्हीही गुण असतात. पण कधीही आपण कोणत्याही व्यक्तीच्या चांगल्या गुणांकडे पाहाणे गरजेचे आहे असे मला वाटते."