Join us
Daily Top 2Weekly Top 5

जिवाभावाच्या मैत्रिणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 13:41 IST

दोन हिरॉईन एकमेकांबद्दल चांगलं बोलतीलच असं नाही.. दोघींच्यामध्ये इतके वैर असतं की त्या एकमेकांच्या वार्‍याला पण उभे राहात नाहीत, ...

दोन हिरॉईन एकमेकांबद्दल चांगलं बोलतीलच असं नाही.. दोघींच्यामध्ये इतके वैर असतं की त्या एकमेकांच्या वार्‍याला पण उभे राहात नाहीत, पण मराठीमध्ये अगदी उलटे चित्र पहायला मिळत आहे. दुबई असो किंवा लवासा श्रृती मराठे आणि नेहा पेंडसे यांचे एकत्र आणि एकसारख्या कॉश्‍चुममध्ये दर्शन घडत आहे, याला कारण आहे त्यांच्यामधील घट्ट मैत्री. आश्‍चर्य म्हणजे, त्यांचे काही फ्रेन्डसदेखील कॉमन आहेत. दोघीही उत्तम डान्सर तर आहेतच पण अद्यापही अविवाहित आहेत..एखाद्या स्वच्छंद पक्ष्याप्रमाणे त्यांची सर्वत्र भ्रमंती सुरू असते. मैत्री असावी तर अशी!