Join us
Daily Top 2Weekly Top 5

कला दर्पण महोत्सवासाठी पाच नाटक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 02:42 IST

महाराष्ट्रातील लोकप्रिय संस्कृती कला दर्पण संस्थेच्यावतीने कला दर्पण गौरव रजनी महोत्सवासाठी पाच नाटक जाहीर कण्यात आले आहे. ही संस्था ...

महाराष्ट्रातील लोकप्रिय संस्कृती कला दर्पण संस्थेच्यावतीने कला दर्पण गौरव रजनी महोत्सवासाठी पाच नाटक जाहीर कण्यात आले आहे. ही संस्था नाट्य आणि सिनेसृष्टीतील कलाकृतींना सन्मान मिळवून देण्यासाठी अविरतपणे कार्य करते. सिनेमा आणि नाटक अशा दोन प्रमुख गटात हा महोत्सव विभागला गेला असून, यंदाच्या '१६ व्या संस्कृती कला दर्पण गौरव रजनी २०१६' पुरस्कारांसाठी नाट्य विभागातून सर्वोत्कृष्ट पाच नाटकांची निवड करण्यात आली आहे, यात शेवग्याचा शेंगा, डोण्ट वरी बी हॅप्पी, आॅल दि बेस्ट २, परफेक्ट मिस मॅच,दोन स्पेशल या नाटकांचा समावेश आहे. या स्पर्धेत एकूण २७ नाटकांनी सहभाग घेतला होता. नाट्य परीक्षण विभागासाठी प्रदीप कबरे, रोहिणी निनावे आणि अविनाश खर्शीकर यांनी यंदाच्या नाट्यस्पर्धेच्या परिक्षणाची धुरा सांभाळली आहे.