सौरभ तिवारींची निर्मिती असलेली जिंदगी की महेक ही मालिका काहीच दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत समीक्षा जैस्वाल ही नवी मुलगी प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत कुणाल वोहरा या अभिनेत्याचा भाऊ करण वोहरा झळकणार आहे. या मालिकेच्या कथेला दिल्ली या शहराची पार्श्वभूमी लाभल्यामुळे या मालिकेचे संपूर्ण चित्रीकरण हे दिल्लीत केले जाणार आहेत. त्यामुळे या मालिकेत प्रमुख भूमिका साकारण्यासाठी एका दिल्लीकराचीच निवड करण्यात आली आहे. करण हा फिटनेसबद्दल प्रचंड जागृक असून त्याचे दिल्लीत फिटनेस क्लबदेखील आहेत. कोई आने को या मालिकेत त्याने पूर्वी छोटीशी भूमिका साकारली होती.
दिल्लीकराला दिली पहिली पसंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2016 14:52 IST