Join us

बालिकावधूच्या टीमचे रियुनियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2016 14:51 IST

बालिकावधू ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेला सुरुवातीच्या काळात खूपच लोकप्रियता मिळाली होती. पण नंतरच्या काळात मालिकेला तितकी ...

बालिकावधू ही मालिका लवकरच संपणार आहे. या मालिकेला सुरुवातीच्या काळात खूपच लोकप्रियता मिळाली होती. पण नंतरच्या काळात मालिकेला तितकी लोकप्रियता टिकवता आली नाही. या मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकेत अनेक नवनवीन कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते. तसेच लीपमुळे अनेक जुन्या कलाकारांनी ही मालिका सोडली होती. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने या मालिकेच्या सगळ्या कलाकारांनी एक रियुनियन केले. यावेळी अविका गौर, अविनाश मुखर्जी, शशांक व्यास, तोरल रासपुत्रा, स्मिता बन्सल अशी सगळीच टीम उपस्थित होती.