कट्टर दुश्मन बनले फ्रेंड्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2016 16:29 IST
नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत अंशुमन मल्होत्रा आणि मृणाल जैन हे एकमेकांचे कट्टर दुश्मन दाखवले आहेत. पण खऱ्या ...
कट्टर दुश्मन बनले फ्रेंड्स
नागार्जुन - एक योद्धा या मालिकेत अंशुमन मल्होत्रा आणि मृणाल जैन हे एकमेकांचे कट्टर दुश्मन दाखवले आहेत. पण खऱ्या आयुष्यात हे दोघे खूपच चांगले फ्रेंड्स आहेत. ते दोघे जीममध्येदेखील एकत्र जातात. मालिकेत आता अर्जुन नागार्जुन बनल्याचे दाखवले जाणार आहे. त्यामुळे मालिकेत त्याला अनेक स्टंट आणि हाणामारीची दृश्य करावी लागणार आहेत. त्यासाठी अशुंमन मृणालच्या मदतीने आपला स्टॅमिना, ताकद वाढवण्यासाठी जिममध्ये अनेक तास घाम गाळत आहे. मृणाल जैनला व्यायामाची प्रचंड आवड आहे. त्याच्या पिळदार शरीरयष्ठीचे नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळे तो अंशुमनला शरीर कमवण्यासाठी मदत करत आहे. याविषयी अंशुमन सांगतो, "मृणाल मला खूप चांगल्यारितीने मार्गदर्शन करत आहे. त्याच्यासोबत काम करताना खूप मजा येतेय."