Join us

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे लेखन करते ही प्रसिद्ध अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 11:27 IST

आई कुठे काय करते ही मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ही मालिका सध्या नव्या वळणावर आली आहे.  अरूंधतीचे ऑपरेशन झाले असून तिला आरामासाठी देशमुख कुटुंब समृद्धी बंगल्यात घेऊन आले आहेत.तर लग्नासाठी उतावळी झालेली संजना लग्नाची तारीख ठरवते. तर दुसरीकडे पुन्हा एकदा अभिषेक अनघाला पुन्हा एकदा माझ्या जीवनाची साथीदार होशील का?, असे विचारतो. त्यावर काहीही न उत्तर देता अनघा तिथून निघून जाते. अभिषेक अनघाच्या जीवनातील नवीन वळणावर हे कथानक सध्या सुरु आहे. तर दुसरीकडे अनिरुद्ध अरुंधतीची सेवा करणार आहे असे ट्विस्ट आणणारी ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेचे लेखन प्रसिद्ध अभिनेत्री करत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेची लेखिका याच मालिकेत डॉक्टरची भूमिका साकारते आहे. ही अभिनेत्री आणि लेखिका म्हणजेच मुग्धा गोडबोले.तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.

चार दिवस सासूचे, एक निर्णय, दुसरी गोष्ट, कदाचित अशा अनेक मालिकांमध्ये तिने काम केले आहे. मुग्धाने हॅम्लेट या नाटकात महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे. हे नाटक खूप लोकप्रिय ठरले होते. सध्या ती श्रीमंत घरची लेक या मालिकेत ही काम करत आहे.

मुग्धाने एका मुलाखतीत लेखनाबद्दल खंत व्यक्त केली होती. तिने  म्हटले होते की, आम्हाला संवाद लेखनासाठी पुरेसा वेळ मिळत असला तरी एकूणच टीव्ही क्षेत्रात मालिकेच्या लेखनाला आजही पुरेसे महत्त्व दिले जात नाही.

ती म्हणाली होती की, स्वातंत्र्य आणि पुरेसा वेळ देऊन विश्वास ठेवला की लेखकाला उत्तम काम करता येते, याचा अनुभव मला आला आहे. मालिकेत ओढून-ताणून नाट्य आणायचे नाही हे वाहिनीने त्यांना प्रथम दिवसापासून सांगितलेले असते. मालिकेतल्या दोन हुशार व्यक्तिरेखांमधील संवाद रंजक करण्यासाठी लेखकाला हा पुरेसा वेळ द्यावा लागतो. हे काम करणे कठीण असते. लेखकाचे काम हे मालिकेच्या टीआरपीशी जुळलेले असते.

ती पुढे म्हणते, एखाद्या पात्रांविषयी लेखक काही विचार करत असतो. मात्र टीआरपीमुळे याउलट जर भूमिका हवी असेल तर त्यानुसार ही लेखकाला आपले लिखाण बदलावे लागते.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका