Join us

फाल्गुनीचे खास आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 10:42 IST

द व्हॉइस इंडिया किड्समधील स्पर्धकांच्या आवाजाचे सगळेच कौतुक करत आहेत. ही लहान मुले प्रसिद्ध गायकांच्या तोडीचे गायन करतात असे ...

द व्हॉइस इंडिया किड्समधील स्पर्धकांच्या आवाजाचे सगळेच कौतुक करत आहेत. ही लहान मुले प्रसिद्ध गायकांच्या तोडीचे गायन करतात असे संगीतातील अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या मालिकेतील स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी संगीतातील अनेक प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमात हजेरी लावत असतात. या कार्यक्रमात नुकतीच फाल्गुनी पाठकने हजेरी लावली होती. या मुलांचा आवाज तिला खूपच आवडला. तिनेदेखील या मुलांसोबत अनेक गाणी गायली. फाल्गुनी पाठकचे सध्या नवरात्रात अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम सुरू आहेत. या कार्यक्रमात गाणे गाण्यासाठी तिने चिमुरड्यांना निमंत्रण दिले आहे. याविषयी ती सांगते, "या मुलांचे आवाज एेकून मी अक्षरशः थक्क झाले होते. या मुलांनी भविष्यात संगीतक्षेत्रात आपले नाम कमवावे यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देते."