Exclusive : या कारणांमुळे अली असगरने सोडला द कपिल शर्मा शो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 16:52 IST
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच अली असगर नानीची भूमिका साकारत आहे. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने हा ...
Exclusive : या कारणांमुळे अली असगरने सोडला द कपिल शर्मा शो
द कपिल शर्मा शो या कार्यक्रमात सुरुवातीपासूनच अली असगर नानीची भूमिका साकारत आहे. पण गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याने हा कार्यक्रम सोडला. सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा यांच्यात झालेल्या वादामुळे अलीने हा कार्यक्रम सोडला असे म्हटले जात होते. पण अलीने अखेर यावर मौन सोडले आहे. द कपिल शर्मा शो हा कार्यक्रम त्याने का सोडला याविषयी त्याने सीएनएक्सशी बातचीत करताना सांगितले आहे. तो सांगतो, कपिल शर्मासोबत झालेल्या विमानाच्या प्रकरणानंतर मी हा कार्यक्रम सोडला असल्याची कित्येक दिवसांपासून चर्चा आहे. पण हा निर्णय काही मी एका दिवसात घेतलेला नाहीये. मला कपिल शर्मासोबत काहीही प्रोब्लेम नाहीये. विमानात जे काही घडले त्याचा देखील मला काहीही प्रोब्लेम नाहीये. केवळ व्यक्तिरेखेमुळे मी हा कार्यक्रम सोडला. नानीची व्यक्तिरेखा खूपच कमी वेळासाठी कार्यक्रमात दाखवली जात होती. माझ्यासाठी वेळ देखील महत्त्वाचा नव्हता. पण नानीच्या व्यक्तिरेखेला योग्य आकार मिळत नसल्याचे मला वाटत होते. हे मला गेले वर्षंभर जाणवत होते. त्यामुळे एप्रिलमध्ये माझे कॉन्ट्रक्ट रिन्यूव्ह करू नका असे मी कार्यक्रमाच्या टीमला आधीच सांगितले होते. मला कुठेच नानीची व्यक्तिरेखा खुलताना दिसत नव्हती. त्याच तुलनेत कॉमेडी नाइट्स विथ कपिल या कार्यक्रमातील दादी या व्यक्तिरेखेला अनेक शेड्स होत्या. या कार्यक्रमाच्या टीमने मला खूप सारी लिब्रटी दिली होती. मी कार्यक्रमात सतत म्हणत असलेले इत्तू सा, तसेच दादीचे नृत्य, दादीची शगुन की पप्पी हे सगळे दादी या व्यक्तिरेखेत सुरुवातीला नव्हते. हे सगळे कालांतराने मी क्रिएट केले होते. मी नेहमीच खऱ्या आयुष्यातील व्यक्तिरेखा माझ्या कॉमेडीच्या पात्रात आणण्याचा प्रयत्न करतो, तेच मी दादीच्या बाबतीत केले होते. पण नानीच्या बाबतीत मला काहीही करता येत नव्हते आणि एक कलाकार म्हणून मला त्याचा प्रचंड त्रास होत होता. मी माझ्या व्यक्तिरेखेला संपूर्णपणे न्याय देत नाहीये असे मला सतत वाटत होते. त्यामुळे मी या कार्यक्रमाला रामराम ठोकण्याचे ठरवले.कपिल शर्माच्या प्रकरणानंतर अलीने कार्यक्रम सोडल्यामुळे अलीने कपिलमुळेच कार्यक्रम सोडला असे मीडियात म्हटले जात होते. यावर अली अतिशय मिश्कील शब्दांत सांगतो, कुछ तो लोग कहेंगे, लोगो का काम है कहना...Also Read : ड्रामा कंपनीचा नवा प्रोमो तुम्ही पाहिला का?