Join us

​आर जे मंत्रा झळकणार हर मर्द का दर्द या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 18:36 IST

आर जे मंत्राने इंडियाज गॉट टायलेंट, फॅमिली फॉरच्युन यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. तसेच नारद मुनी महागुणी या ...

आर जे मंत्राने इंडियाज गॉट टायलेंट, फॅमिली फॉरच्युन यांसारख्या अनेक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. तसेच नारद मुनी महागुणी या कॉमेडी मालिकेत त्याने काम केले होते. दिल पतंग या चित्रपटातदेखील तो झळकला होता. आता तो एका मालिकेत काम करणार आहे.मंत्रा हा त्याच्या कॉमिक टायमिंगसाठी ओळखला जातो. हर मर्द का दर्द या मालिकेत आता त्याची लवकरच एंट्री होणार आहे. या मालिकेतील त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची असणार आहे. ही मालिकादेखील कॉमिक मालिका असल्याने प्रेक्षकांना त्याची कॉमेडी या मालिकेतदेखील पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो जिग्गी ही भूमिका साकारणार असून तो विनोद खन्ना म्हणजेच फैजल रशीद आणि त्याची पत्नी सोनू म्हणजेच झिनल बेलाणीचा मित्र दाखवणार आहेत. त्याच्या एंट्रीमुळे मालिकेला एक नवे वळण मिळणार आहे. या मालिकेचे दिग्दर्शक परमित सेठी असल्याने त्याने या मालिकेत काम करण्याचे ठरवले असल्याचे तो सांगतो. या मालिकेतील त्याच्या भूमिकेविषयी अधिक माहिती देताना मंत्रा सांगतो, "ही मालिका परमित सेठी दिग्दर्शित करत असल्याने मी ही मालिका स्वीकारण्याचा निर्णय घेतला. मी दिग्दर्शित करत असलेल्या मालिकेत काम करशील का असे परमितने मला विचारल्यावर मी क्षणाचाही विलंब न लावता त्याला होकार दिला. परमित हा एक खूप चांगला दिग्दर्शक आहे. तो आपल्या कलाकारांना अभिनयात सुधारणा करण्यासाठी वाव देतो त्यामुळे त्याच्यासोबत काम करायला मजा येते. परमित आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री असल्याने मी त्याच्यासोबत खूप कर्म्फटेबल आहे. माझी परमितशी ओळख अर्चना पुरणसिंहमुळे झाली होती. आज आमच्या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री आहे."