‘पसंत आहे मुलगी’ची रेसमध्ये एंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 16:06 IST
टिआरपीच्या रेसमध्ये कोणती मालिका कधी अव्वल ठरेल हे सांगता येत नाही. ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका कित्येक महिन्यांपासून टिआरपीच्या रेसमध्ये ...
‘पसंत आहे मुलगी’ची रेसमध्ये एंट्री
टिआरपीच्या रेसमध्ये कोणती मालिका कधी अव्वल ठरेल हे सांगता येत नाही. ‘नांदा सौख्यभरे’ ही मालिका कित्येक महिन्यांपासून टिआरपीच्या रेसमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. या आठवड्यात टिआरपीच्या स्पर्धेत एका नव्या मालिकेने आपली जागा बनवली आहे. ‘पसंत आहे मुलगी’ या मालिकेला प्रेक्षकांची तितकीशी पसंती मिळत नाही अशी चर्चा सुरू असतानाच या मालिकेने टिआरपीच्या स्पर्धेत दुसरा नंबर पटकवला आहे. टिआरपीच्या रेसमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ तिसºया क्रमांकावर, ‘जय मल्हार’ चौथ्या क्रमांकावर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ पाचव्या क्रमांकावर आहे.