Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कसौटी जिंदगी की 2'च्या कलाकारांसोबत एकता कपूरने घेतले तिरूपती बालाजीचे आशिर्वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 11:02 IST

स्टारप्लसवरील आगामी मालिका ''कसौटी जिंदगी की 2''  प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाले आहे. ह्या मालिकेने १८ वर्षांनंतर टीव्हीवर  खूप प्रेम आणि लोकप्रियता मिळवली आहे. 

ठळक मुद्दे मालिकेच्या प्रीमिअरच्या आधी एकताने तिरूपती बालाजी मंदिराला भेट दिलीकसौटी जिंदगी' मालिकेत  उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाही भूमिका साकारली होती

स्टारप्लसवरील आगामी मालिका ''कसौटी जिंदगी की 2''  प्रेक्षकांच्या भेटीस पुन्हा एकदा येण्यास सज्ज झाले आहे. ह्या मालिकेने १८ वर्षांनंतर टीव्हीवर  खूप प्रेम आणि लोकप्रियता मिळवली आहे. ह्या मालिकेबद्दल प्रेक्षकांची उत्कंठा अगदी ताणली गेली आहे, असं दिसतेय की ह्या मालिकेच्या निर्मात्या एकता कपूर ह्या लव्हस्टोरीला पुन्हा एकदा हिट बनवण्यासाठी कुठलीही कसर बाकी ठेवत नाहीये. ह्या  मालिकेच्या प्रीमिअरच्या आधी एकताने तिरूपती बालाजी मंदिराला भेट दिली आणि ह्या मालिकेच्या यशासाठी आशिर्वाद घेतले. तिने इन्स्टाग्रामवर ह्याबद्दल पोस्टही केले.

पूर्वी 'कसौटी जिंदगी' मालिकेत  उर्वशी ढोलकियाने कोमोलिकाही भूमिका साकारली होती. आजही उर्वशीला पाहाताच कोमोलिका ही इमेज रसिक विसरलेले नाहीत.इतक्या वर्षानंतरही कोमोलिकाची जादु कायम असल्याचे वारंवार पाहायला मिळते.या मालिकेत गाजलेले निगेटीव्ह कॅरेक्टर कोमोलिकाच्या भूमिकेत हिना खान तर श्वेता तिवारीने साकारलेली प्रेरणा ही भूमिका  एरिका फर्नांडिस साकारणार असून अनुरागच्या भूमिकेत पार्थ समंथन झळकणार आहे.

नव्या रुपात आणि नव्या ढंगात ही मालिका रसिकांच्या भेटीला येत असताना 9 वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेच्या आठवणीत रसिक रमताना दिसत आहे. तर दुसरीकडे कोमोलिकाच्या रूपात हिना आणि पूर्वी कोमोलिका साकारलेली उर्वशी यामध्येही आत्तापासूनच तुलना केली जात आहे. फक्त ट्रेलरवरुन दोन अभिनेत्रींमध्ये तुलना करणं योग्य नसल्याचेही सोशल मीडियावर चर्चा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. 

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2एकता कपूर