Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोमोलिकाच्या या सुंदर लूकमागे आहे या व्यक्तीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 17:04 IST

कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमालिका ही भूमिका हिना खान साकारत असून या मालिकेतील तिच्या लूकची चांगलीच चर्चा आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध खलनायिकेचे नुकतेच दणक्यात पुनरागमन झाले आहे. कसौटी जिंदगी की या मालिकेत कोमालिका ही भूमिका हिना खान साकारत असून या मालिकेतील तिच्या लूकची चांगलीच चर्चा आहे. तिच्या या लूकवर स्वतः एकता कपूरने प्रचंड मेहनत घेतली आहे.

ग्लॅमरस दिसण्यामुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण सादरीकरणामुळे दशकभरापूर्वी कोमोलिकाने प्रेक्षकांमध्ये तिची विशिष्ट अशी जागा निर्माण केली होती. आता आपल्या मादक सौंदर्याने प्रेक्षकांमध्ये ती भावना पुन्हा एकदा जागृत करण्यास हिना खान सिद्ध झाली आहे. कोमोलिकाच्या रूपासंदर्भात हिना खान सांगते, “कोमोलिकाची व्यक्तिरेखा ही पूर्णपणे एकता मॅडमच्या कल्पनेतून साकार झालेली असून कोमोलिकाचं रुप कसं असेल आणि तिला कशा प्रकारे सादर केलं जाईल, याची त्यांना सुस्पष्ट कल्पना होती. कोमोलिकाच्या निर्मितीत त्यांचा पूर्णपणे सक्रिय सहभाग होता आणि त्यांनी तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष दिले होते. तिच्या वेशभूषेपासून तिच्या केसांच्या बटा कशा असतील, इथपर्यंत सर्व बाबतीत त्यांनी स्वत: लक्ष घातलं होतं आणि नव्या आवृत्तीतीत कोमोलिका ही फॅशनेबल असेल याची खबरदारी त्यांनी घेतली होती. कोमोलिकाचा लूक निश्चित करण्यापूर्वी त्यावर त्यांनी भरपूर संशोधन केले होते. कोमोलिकाच्या कानातील रिंगांपासून तिच्या पैंजणांपर्यंतचे सर्व दागिने हे ऑक्सिडाइज्डपासून बनविले आहेत. आजच्या तरुणींमध्ये आता ते नवी फॅशन म्हणून स्थान पटकावतील, याची मला खात्री आहे. मला माझा हा लूक अत्यंत आवडला असून मला स्वत:ला इतकं ग्लॅमरस कधीच वाटलं नव्हतं. कोमोलिकाचं नवं रूप हे फॅशन जगतात नवा पायंडा पाडणारं ठरेल, याची पूर्ण खबरदारी एकता मॅडमने घेतली आहे, याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही.”

कोमोलिकाच्या रुपात हिना खानला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळत आहे. आपल्या आकर्षक मादक सौंदर्याच्या जोरावर कोमोलिका प्रेक्षकांना पुन्हा एकवार आपल्या प्रेमात पाडण्यात यशस्वी होईल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे.

कसौटी जिंदगी की ही मालिका प्रेक्षकांना सोमवार ते शुक्रवार रात्री 8.00 वाजता ‘स्टार प्लस’वर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :कसौटी जिंदगी की 2हिना खानएकता कपूर