Join us
Daily Top 2Weekly Top 5

एकता कपूरने दिले कोमोलिकाला नवे रूप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 12:52 IST

‘स्टार प्लस’वरील ‘कसौटी झिंदगी के’ ही मालिका पुढील आठवड्यापासून प्रसारित होणार असून त्यातील सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा ‘कोमोलिका’ कशी असेल, याबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागली आहे.

ठळक मुद्देकता कपूरने या मालिकेत कोमोलिका जी चोळी परिधान करणार आहे

स्टार प्लस’वरीलकसौटी झिंदगी के’ ही मालिका पुढील आठवड्यापासून प्रसारित होणार असून त्यातील सर्वाधिक चर्चित व्यक्तिरेखा ‘कोमोलिका’ कशी असेल, याबद्दल सर्वांनाच प्रचंड उत्सुकता लागली आहे. मूळ मालिकेच्या प्रसारणानंतर अल्पावधीतच कोमोलिकाचे नाव प्रत्येक प्रेक्षकाच्या ओठांवर होते. त्यामुळेच आता या मालिकेच्या नव्या स्वरूपात कोमोलिकाचे रूप कसे असेल, याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

गेल्या काही दिवसांत मालिकेची निर्माती एकता कपूरने या मालिकेत कोमोलिका जी चोळी परिधान करणार आहे, अशा काही ‘बॅकलेस चोलीं’ची छायाचित्रे आपल्या सोशल मीडियातून प्रसृत केली होती. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा एकता कपूरची आवडती असली, तरी त्यातील कोमोलिकाची व्यक्तिरेखा ही तिच्या खास आवडीची आहे. त्यामुळे ती तिच्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टींवर जातीने देखरेख करीत आहे. कोमोलिका कशी दिसेल, यावर एकताने केलेले भाष्य असे, “कोमोलिका ही माझ्या हृदयाचाच एक तुकडा आहे आणि म्हणूनच ती किती ग्लॅमरस आणि सुंदर दिसेल यासाठी मी कोणतीही कसर शिल्लक ठेवणार नाही. ती मादक आणि आकर्षक खलनायिका असून तिच्या अतिशय उंची आणि फॅशनेबल कपड्यांबद्दल ती प्रसिध्द आहे. नव्या स्वरूपातील मालिकेत तिचे कपडे अधिकच वैशिष्ट्यपूर्ण असतील आणि प्रेक्षकांना तिला पाहताना मनस्वी आनंद वाटेल, याची मला खात्री आहे.” या मालिकेतून अनुराग आणि प्रेरणाची अजरामर प्रेमकथा जरी सादर होत असली, तरी या दोघांच्या जीवनात अनेक उलथापालथी घडवून आणण्यासाठी कोमोलिकाचा प्रवेश आवश्यक ठरणार आहे. टीव्हीवरील या सर्वात मादक खलनायिकेचे नवे, मादक रूप पाहण्यास सज्ज व्हा!

टॅग्स :एकता कपूरकसौटी जिंदगी की 2स्टार प्लस