Join us

​ये मोह मोह के धागे या मालिकेत एजाज खानचा दिसणार नवा लूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2017 17:32 IST

एजाज खानने कही तो होगा या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर केसर, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू ...

एजाज खानने कही तो होगा या मालिकेपासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर केसर, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू थी, काव्यांजली यांसारख्या मालिकांमध्ये तो झळकला. तो गेल्या वर्षी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत झळकला होता. तसेच त्याने मोठ्या पडद्यावरही आपले नशीब आजमावले आहे. त्याने कुछ ना कहो, तनू वेड्स मनू, तनू वेड्स मनू रिटर्न्स यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता तो कित्येक महिन्यांनंतर ये मोह मोह के धागे या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. या मालिकेत एजाजचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत तो गुजरातमधील  एका गावातील एका सरपंचाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेत एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून ही प्रेमकथा खूपच वेगळी आहे. शहरात वाढलेली एक मुलगी आणि गावातील सरपंच यांच्यातील ही प्रेमकथा आहे. सामाजिक बंधनांना झुगारून देणारे हे जोडपे असून ही प्रेमकथा प्रेक्षकांना खूप आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. गावात राहाणाची एक व्यक्ती आपल्यासाठी मुलगी पाहात असते आणि त्यासाठी त्याला शहरातील एक मुलगी मदत करत असते. पण या दरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात अशी या मालिकेची कथा आहे. या मालिकेत बेनाफ दादाचंदजीदेखील प्रमुख भूमिका साकारत आहे. एजाजने बालाजी टेलिफ्लिम्ससोबत त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. मला काहीही अभिनय येत नसताना एकताने मला तीन वर्षांसाठी साइन केले यासाठी मी एकता कपूर यांचा नेहमी आभारी राहीन असे तो सांगतो.