Join us

अरे तो मी नव्हे, ड्रग्स प्रकरणात अडकलेला एजाज खानमुळं या अभिनेत्याला सहन करावा लागतोय मनस्ताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2021 13:56 IST

Eijaz Khan is not happy that he is being mistaken for Ajaz Khan: ड्रग्स केसमध्ये NCB ने अटक केलेल्या एजाज खानने  ​२००९ मध्ये रिलीज झालेल्या 'Ek: The Power of One' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं.

अनेकदा कलाकारांची सेम नावं असल्यामुळे नेमका कोणत्या कलाकाराविषयी बोलले जात आहे हा गोंधळ होतो. असाच गोंधळ एजाज खान या नावामुळे झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून ड्रग्स प्रकरणात नाव समोर आल्यानंतर अभिनेता एजाज खान वादात सापडला आहे. रोज त्यांच्या ड्रग्स संबधित येणा-या नवीन नवीन बातम्यांमुळे बिग बॉस फेम अभिनेता एजाज खानसाठी आता डोकेदुखी ठरली आहे.

बिग बॉसमधील अभिनेत्याला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. ही बातमी एका एजाजसाठी खरी आहे तर दुस-यासाठी खोटी बातमी आहे. कारण दोन्ही एजाज खान अभिनय क्षेत्रात काम करतात. त्याहूनही विशेष म्हणजे दोघांनीही बिग बॉस शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. यात नावामुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. फक्त नावच सेम आहेत, दोन्ही वेगवेगळ्या व्यक्ती आहेत असे एजाज खानला रोज सांगावे लागत आहे.

 

अनेकांना एजाज खान म्हटले तर 'बिग बॉस१४' मध्ये झळकलेला एजाज खानवरच आरोप लावले जात असल्याचे अनेकांना वाटत आहे. रोज सोशल मीडियाद्वारे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. त्यामुळेच आता ड्रग्स प्रकरणात अडकलेला एजाज खान मी नव्हे असे सांगण्याची या अभिनेत्यावर वेळ आली आहे. अनेकदा नावात काय ठेवलय असा डययलॉग आपण ऐकतो.

 

मात्र नावात खूप काही दडलंय हेच स्पष्ट करणारा किस्सा सध्या एजाज खानला सामोरे जावे लागत आहे. अनेकजण मला संशयाच्या नजरेनं पाहतात, माझ्या खाजसगी आयुष्यावर याचा प्रचंड वाईट परिणाम होत आहे.लोकांना तरी मी किती समजवणार असेही त्याने सांगितले आहे. वारंवार त्याला त्याची ओळख पटवून द्यावी लागत आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

ड्रग्स केसमध्ये NCB ने अटक केलेल्या एजाज खानने  ​२००९ मध्ये रिलीज झालेल्या 'Ek: The Power of One' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूड पदार्पण केलं होतं. त्यानंतर तो 'लम्हा', 'अल्लाह के बंदे', 'रक्त चरित्र 2', 'बुड्ढा होगा तेरा बाप', 'बादशाह', 'हार्ट अॅटॅक' आणि 'टेंपर' या चित्रपटांमध्ये दिसला. तसेच २०२०मध्ये त्याचा चित्रपट 'गुल मकाई' रिलीज झाला होता. एजाजच्या पर्सनल लाइफबद्दल बोलायचं तर त्यानं अँड्रिया खानशी लग्न केलं होतं आणि या दोघांनी अॅलेक्झँडर नावाचा एक मुलगा सुद्धा आहे