Join us
Daily Top 2Weekly Top 5

संध्या पुन्हा पोलीस खात्यात रुजू ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:54 IST

‘दिया और बाती हम’ या मालिकेला सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाल्यानंतर निर्मात्यांनी टीआरपी सुधारण्यासाठी चांगलीच कंबर कसलीय. त्यामुळं या मालिकेत एक ट्विस्ट ...

‘दिया और बाती हम’ या मालिकेला सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ मिळाल्यानंतर निर्मात्यांनी टीआरपी सुधारण्यासाठी चांगलीच कंबर कसलीय. त्यामुळं या मालिकेत एक ट्विस्ट येणार आहे.मालिकेतील सा-यांची लाडकी संध्या (दीपिका सिंग) पुन्हा एकदा पोलीस खात्यात रुजू होणार आहे. संध्याला कन्या रत्नाचा लाभ झाला असून या गोंडस परीच्या नामकरण सोहळ्यात तिला हे गिफ्ट मिळणार आहे.बालिकेच्या नामकरण समारंभाला पोलीस खात्यातील वरिष्ठ हजेरी लावणार असून तेच संध्याला ही गुडन्यूज देणार आहेत.. त्यात संध्याचा पती सूरज पॅरेलिसिसच्या आजारातून सावरलाय. त्यामुळं दिया और बाती हमच्या रसिकांना तिहेरी खुशखबर मिळणार आहे..