व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पार्टीत उपस्थित असलेली काही मंडळी सपनाला जोरदार नाचवित आहेत. तिच्यावर पैसे उधळताना तिच्यासोबत ठेकाही धरत आहेत. सपनाने पांढºया आणि केसरी रंगाचा सलवार सूट घातलेला आहे. डोक्यावर दुपट्टा बांधून सपना असा काही डान्स करीत आहे की, सगळेच तिच्यावर फिदा होत आहेत. वयाच्या बाराव्या वर्षी डान्सिग करिअरला सुरुवात करणारी सपना सुरुवातीला छोट्या-मोठ्या पार्ट्यांमध्ये डान्स करीत होती. कदाचित हा व्हिडीओ तेव्हांचाच असावा.
मात्र काहीही असो, सपनाचा हा कारनामा सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वीच सपनाने प्रियांकच्या सांगण्यानुसार अर्शी खानचे ‘गोवा-पुणे’ कनेक्शन उघड केले होते. सपनाच्या या खुलाशामुळे अर्शी खान खूपच दु:खी झाली होती. परंतु आता सपना चौधरीच्या काही खासगी गोष्टी समोर आल्याने तीही चर्चेत आली आहे.