Join us

​परदेस में है मेरा दिल या मालिकेतील अर्जुन बिजलानीने व्यक्त केले हे स्वप्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 16:56 IST

परदेस में है मेरा दिल या मालिकेला सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती ...

परदेस में है मेरा दिल या मालिकेला सुरू होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेतील अर्जुन बिजलानी आणि दृष्टी धामी यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत राघवची भूमिका साकारणाऱ्या अर्जुनने नुकतेच त्याचे एक स्वप्न त्याच्या फॅन्ससोबत शेअर केले आहे.लहानपणापासून प्रत्येकाला आपण एखाद्या ठरावीक क्षेत्रात करियर करावे असे वाटत असते. लहान मुलांना तुला काय बनायचे आहे असे विचारले तर ते सर्रास उत्तर डॉक्टर, वकील, पोलिस, शिक्षक यांपैकी एक दिले जाते. अर्जुन बिजलानी आज एक प्रसिद्ध अभिनता असला तरी त्याला लहानपणी कधीच अभिनता बनायचे नव्हते. त्याला लहानपणी कोणी तुला काय बनायचे आहे असे विचारले तर तो मला पोलिस बनायचे आहे असेच सांगायचा. त्याला लहानपणापासूनच चित्रपट पाहाण्याची प्रचंड आवड आहे. चित्रपटात आणि मालिकांमध्ये पोलिस वाईट लोकांसोबत दोन हात कशाप्रकारे करतात ते पाहून त्यालादेखील पोलिस बनण्याची इच्छा होती. याविषयी अर्जुन सांगतो, "लहान असताना पोलिस अधिकारीच व्हायचे असे मी मनाशी ठरवले होते. पोलिसांचा पेहराव, ते गुंडांना कशाप्रकारे मारतात हे पाहून माझ्या अंगावर रोमांच उभे राहात असत. मला चित्रपटातील कोणत्याही भूमिकेपेक्षा पोलिसांची भूमिका अधिक आवडत असे. पण मी मोठा झाल्यानंतर पोलिस बनायचा विचार सोडून दिला मी अभिनयाकडे वळलो. मी जर अभिनेता बनलो नसतो तर नक्कीच पोलिस अधिकारी बनलो असतो."