‘डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी क्लिनिक’मध्ये सुनील ग्रोव्हरला मिळाली किकू शारदाची साथ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2017 10:04 IST
कपिल शर्माची ‘साथ’ सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर दिल्लीतील एका शोसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे सुनीलला या शोसाठी किकू शारदाची ...
‘डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी क्लिनिक’मध्ये सुनील ग्रोव्हरला मिळाली किकू शारदाची साथ!
कपिल शर्माची ‘साथ’ सोडल्यानंतर सुनील ग्रोव्हर दिल्लीतील एका शोसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे सुनीलला या शोसाठी किकू शारदाची सोबत मिळाली आहे. होय, येत्या १ एप्रिलला दिल्लीत सुनील आणि किकू हे दोन्ही कॉमेडियन एक लाईव्ह शो करणार आहेत. या शोचे नाव ‘डॉ. मशहूर गुलाटी कॉमेडी क्लिनिक’ असे ठेवण्यात आले आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनील नवा शो घेऊन येणार, अशी चर्चा असल्याने सुनीलचा हा लाईव्ह शो महत्त्वपूर्ण मानला जात आहे.ALSO READ : सुनील ग्रोव्हरसह कलाकार न आल्याने ‘द कपिल शर्मा शो’चे शूटिंग रद्दकॉमेडियन कपिल शर्मा आणि त्याचा टीममेट सुनील ग्रोव्हर यांच्यातील वाद आणि मारहाणीच्या बातमीने अलिकडे सगळ्यांचेच लक्ष वेधले होते. काही दिवसांपूर्वी आॅस्ट्रेलियातील सिडनी आणि मेलबर्नमधील शो संपवून मुंबईत परत येत असताना कपिलने त्याच्या शोमध्ये डॉ. गुलाटी आणि रिंकू भाभीची भूमिका साकाणा-या सुनील ग्रोव्हरला मारहाण केली होती. तू माझा नोकर आहेत. तुझा शो फ्लॉप आहे, तू फ्लॉप आहे, असं काय काय ते कपिल दारूच्या नशेत सुनीलला बोलून गेला होता. यामुळे सुनील खूप दुखावल्याचे वृत्त पाठोपाठ मीडियात उमटले होता. सुनील कपिलचा शो सोडणार, अशीही बातमी आली होते. या संपूर्ण प्रकारानंतर ‘इतना तो चलता है...’ असे सांगत कपिलने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला होता. सुनीलची मनधरणी करण्याचे त्याने पूरेपूर प्रयत्न केले होते. पण सुनीलने त्याच्या या प्रयत्नांना भीक न घातल उलट ‘स्वत:ला देव समजू नकोस,’ असा सल्ला त्याला दिला होता. तेव्हापासून सुनील कपिलच्या शोमध्ये परतलेला नाही. त्याच्यासोबत अली असगर आणि चंदन प्रभाकर यांनीही कपिलच्या शोमध्ये न परतण्याचा निर्णय घेतला आहे.