‘डॉ. भानुमती होणार ऑफ ड्युटी’
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 12:34 IST
छोट्या पडद्यावरील दबंग अभिनेत्री कविता कौशिकची डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेतून टीव्हीवर कमबॅक झालं होतं. या मालिकेतील आर्मी ...
‘डॉ. भानुमती होणार ऑफ ड्युटी’
छोट्या पडद्यावरील दबंग अभिनेत्री कविता कौशिकची डॉ. भानुमती ऑन ड्युटी या मालिकेतून टीव्हीवर कमबॅक झालं होतं. या मालिकेतील आर्मी डॉक्टर ही भूमिका साकारण्यासाठी कविता उत्साहित होती. मात्र आता या भूमिकेपासून आणि मालिकेवर समाधानी नसल्याचं सांगत कवितानं सा-यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. आता तर कवितानं हा शो सोडण्याचा निर्णय घेतलाय. इतकंच नाही तर कवितानं एक महिन्याची नोटीसही दिलीय.. कविताच्या जागी आता अभिनेत्री श्वेता तिवारीची या मालिकेत एंट्री होणार आहे. मात्र यावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब होणं बाकी आहे..