Join us
Daily Top 2Weekly Top 5

डॉनची एक्स गर्लफ्रेंड मोनिका बेदी झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 16:57 IST

डॉन अबू सलेमची  गर्लफ्रेंड म्हणूनच जास्त प्रसिध्दीत राहिली ती  अभिनेत्री मोनिका बेदी हे काही वेगळे सांगायला नको, तिच्या अभिनयामुळे ...

डॉन अबू सलेमची  गर्लफ्रेंड म्हणूनच जास्त प्रसिध्दीत राहिली ती  अभिनेत्री मोनिका बेदी हे काही वेगळे सांगायला नको, तिच्या अभिनयामुळे नाहीतर अबु सलेम कनेक्शनमुळेच ती जास्त लक्षात राहिली.खरे तर मोनिकाने बॉलिवूडमध्ये पर्दापन केले तेव्हाच सलेमचे तिच्यावर प्रेम जडले होते. सलेमनेच तिला बॉलिवूडमध्ये सेटल करण्यासाठी निर्मार्त्यांकडे शिफारशी केल्या होत्या. त्यामुळे मोनिकाला काही चित्रपटांमध्ये कामही मिळाल्याचे बोलले जाते.जेव्हा सलेमने बॅँकॉकमध्ये स्वत:चे बस्तान बसविले तेव्हा मोनिकालाही बॅँकॉकला बोलावून घेतले. मात्र खोट्या पासपोर्टच्या आरोपाखाली मोनिकाला बॅँकॉकमध्ये काही वर्ष तरुंगातच काढावे लागले. त्यानंतर या दोघांनाही भारतात आणण्यात आले. काही वर्षानंतर मोनिका पुन्हा अभिनय क्षेत्राकडे वळली. त्या दरम्यान ती काही मालिकांमध्येही झळकली.आता पुन्हा एकदा जवळपास तीन वर्षांनंतर मोनिका बेदी  टीव्ही मालिकांमध्ये झळकण्यासाठी सज्ज झाली आहे.‘मासूम’ या मालिकेत ती नेगेटीव्ह शेड असलेली  भूमिका साकारणार आहे. गेले तीन वर्षे टीव्हीच्या पडद्यापासून दूर राहिलेली ही मोनिकाच या  भूमिकेला योग्य न्याय देवू शकते असे ‘मासूम’चे निर्मात्यांना वाटले त्यानुसार मोनिका बेदीला या विषयी विचारण्यात आले. भूमिकाही मोनिकाला आवडली आणि त्यानुसार तिने निर्मात्यांना होकार कळवला.यापूर्वी मोनिकाने 'बिग बॉस 2', 'झलक दिखला जा 3' आणि 'सरस्वतीचंद्र'(2013-14) शिवाय मोनिकाने 'बंधन' मालिकेतही काम केले आहे.मोनिकासह या मालिकेसाठी मनिष गोएल,रिकी पटेल आणि अमृता मुखर्जी  हे कलाकारही झळकणार आहेत.‘मासूम’ ही एक सूडकथा असून या मालिकेचे मुख्य वैशिष्ट्य़ म्हणजे यात प्रमुख भूमिका साकारणारा बालकलाकार रिकी पटेल छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेत झळकणार आहे. लवकरच ही मालिका रसिकांच्या भेटीस येणार आहे.