नच बलिये या कार्यक्रमात सनम जोहर-अबिगल पांडे हे रनर अप ठरले होते. नच बलिये या कार्यक्रमासाठी ते गेल्या कित्येक महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. त्यामुळे आता कार्यक्रम संपल्यावर ते व्हेकेशनवर गेले आहेत. ते सध्या गोव्यात असून एकमेकांसोबत खूप चांगला वेळ घालवत आहेत.
सनमने त्यांच्या व्हेकेशनचे खूप सारे फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून या फोटोंची सध्या चांगलीच चर्चा आहे. या फोटोंना खूप साऱ्या लाईक्स मिळत असून अनेकांनी या फोटोंवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या फोटोंमध्ये सनम आणि अबिगलची खूप छान केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळत आहे. नच बलिये या कार्यक्रमाच्या दरम्यान देखील प्रेक्षकांना या दोघांची केमिस्ट्री खूपच आवडली होती. यामुळे सनम आणि अबिगल ही प्रेक्षकांची आवडती जोडी बनली होती. या कार्यक्रमाच्या दरम्यानच सनमने अबिगलला अंगठी घालून प्रपोज केले होते. सनमने पोस्ट केलेल्या फोटोमुळे ते दोघे हॉट कपल असल्याचे त्यांच्या चाहत्यांना वाटत आहे.
Also Read : दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया युरोपमध्ये सेलिब्रेट करताहेत लग्नाचा पहिला वाढदिवस