Join us  

फोटोत अशोक सराफ यांच्यासोबत दिसणाऱ्या या तरुणीला ओळखलंत का?, आज आहे टीव्हीवरील लोकप्रिय चेहरा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 1:08 PM

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का?

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासोबत फोटोत दिसणाऱ्या या तरुणीला तुम्ही ओळखलंत का? ही तरुणी दुसरी तिसरी कुणी नसून तुमच्या सर्वांची लाडकी अरुंधती उर्फ अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभुलकर (Madhurani Gokhale-Prabhulkar) आहे. हा फोटो नवरा माझा नवसाचा चित्रपटातील आहे. या चित्रपटात मधुराणीने विनोदी भूमिका साकारली होती.

मधुराणीने 'नवरा माझा नवसाचा'मध्ये एक विनोदी भूमिका साकारली होती. यामध्ये तिचे विनोदी संवाद चक्क विनोदाचे सम्राट अशोक सराफ यांच्यासोबत होते. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, जॉनी लिव्हर, रीमा लागू, विजय पाटकर, निम्रिती सावंत, वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटात मधुराणीने एक छोटीशी पण धमाल भूमिका साकारली होती.

मधुराणीनं 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटात व्हीजे कँडी ही भूमिका साकारली आहे. 'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटाचा एक मोठा चाहतावर्ग आजही आहे, या प्रेक्षकांना कँडी आणि बस कंडक्टर लालू (अशोक सराफ) यांच्यातील विनोदी संवाद आजही तितकाच आवडतो. फाडफाड इंग्रजी बोलणारी कँडी आणि इंग्रजीचा गंध नसणारा लालू कंडक्टर यांच्यातील हा संवाद प्रेक्षकांना खळखळून हसवतो. सोशल मीडियावरही त्यांच्या या संवादाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

मधुराणी गोखले प्रभुलकर हिने यापूर्वी 'असंभव', 'इंद्रधनुष्य' या मालिकांमध्ये काम केले आहे. तिने 'सुंदर माझं घर', 'मणी मंगळसूत्र' या चित्रपटातही काम केले. तिने मुलीच्या जन्मानंतर कामातून काहीसा ब्रेक घेतला. यानंतर जवळपास १० वर्षांनी तिने 'आई कुठे काय करते' मालिकेतून कमबॅक केले. 

 

टॅग्स :मधुराणी प्रभुलकरअशोक सराफ