Join us  

बहिणीसोबत उभा असलेल्या या चिमुकल्याला ओळखलंत का?, आज मराठी कलाविश्वातील आहे प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 6:00 AM

आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात.

Guess Who: बालपणीचा काळ सुखाचा असं कायमच म्हटलं जातं. आपण किती मोठे झालो तरी प्रत्येकालाच बालपणीच्या आठवणींमध्ये रमायला आवडते. सेलिब्रिटीही याला अपवाद नाहीत. आजवर असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कलाविश्वात स्वत:च स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. तुफान लोकप्रियता मिळविली आहे. मात्र आजही ते त्यांच्या बालपणींच्या आठवणींमध्ये रमतात. तसेच सध्याचं जग सोशल मीडियाचं आहे, त्यामुळे ही कलाकार मंडळी बऱ्याचवेळा आपल्या चाहत्यांसोबत त्यांच्या बालपणीच्या आठवणी शेअर करत असतात. आता एका लोकप्रिय अभिनेत्याचा  लहानपणीचा फोटो व्हायरल होतोय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एका अभिनेत्याचा बालपणीचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहिल्यावर त्याला ओळखणं देखील कठीण झालं आहे. या फोटोमध्ये बहिणीसोबत उभा असलेला चिमुकला साईंकित कामत आहे. रात्रीस खेळ चाले 3 मध्ये अभिरामच्या भूमिकेत साईंकित कामत दिसत आहे. याआधीच्या 'रात्रीस खेळ चाले' दोनही सीझनचा भाग साईंकित होता. साईंकित सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असून तो त्याचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे.

आजवर साईंकितने सालस, समंजस तरीही वैविध्यपूर्ण अशा भूमिका साकारून प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. छोट्या पडद्यावर 'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील अभिराम या भूमिकेतून तो घराघरात पोहचला होता. छोट्या पडद्यावर नशीब आजमवल्यानंतर साईंकित रूपेरी पडद्यावर मिरांडा हाऊस सिनेमातून एंट्री घेतली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकाररात्रीस खेळ चाले ३