Join us
Daily Top 2Weekly Top 5

शाळेच्या ओळखपत्रावर दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का?; आज आहे ती टेलिव्हिजनवरील लोकप्रिय सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 14:02 IST

बऱ्याचदा सोशल मीडियावर सेलिब्रेटींच्या बालपणीचे फोटो व्हायरल होताना दिसतात.

मोठ्या किंवा छोट्या पडद्यावरील कलाकार असोत, चाहत्यांना त्यांची एक झलक पाहिली तरीदेखील त्यांचा दिवस चांगला जातो, असे ते मानतात. सोशल मीडियाच्या या युगात चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. दरम्यान नुकतेच एका चिमुकलीचा फोटो सध्या व्हायरल होताना दिसत आहे. समोर आलेला फोटो एका मुलीच्या शाळेच्या ओळखपत्राचे आहे. या कार्डवर मुंबईतील जुहू भागातील पाम बीच नर्सरी स्कूलचे नाव लिहिलेले आहे.

ओळखपत्रावर शाळेसोबतच मुलांचीही नावदेखील असते. पण या मुलीने नाव लिहिलेल्या जागी पेन्सिलने अनेक खुणा केल्या आहेत, ज्यामुळे लोकांना ओळखता येत नाही. या मुलीचे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुपमा (Anupama) सोबत खास नाते आहे. जर तुम्ही विचार करत असाल की ही त्या मालिकेची मुख्य अभिनेत्री रुपाली गांगुली असेल तर तुम्ही चुकीचे आहात. ही दुसरी कोणी नसून अनुपमाची मोठी सून किंजल म्हणजेच निधी शाह (Nidhi Shah)च्या बालपणीचा फोटो आहे.

खुद्द निधी शाहने नुकताच हा फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले - 'बालपण, १९९६'. निधीच्या या क्युट फोटोला खूप पसंती मिळते आहे. या फोटोवर लोक कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अनुपमा ही मालिका टीआरपीच्या यादीत अव्वल आहे. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत अभिनेत्री निधी शाह किंजलची भूमिका साकारत आहे. ती अनेकदा तिच्या लेटेस्ट फोटोशूटमुळे चर्चेत येत असते.