Join us
Daily Top 2Weekly Top 5

​तुम्हाला माहीत आहे का राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला यांनी हम पाचमध्ये केले होते एकत्र काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2017 12:37 IST

राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला सध्या सजन रे फिर झूठ मत बोलो या कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत. सजन ...

राखी विजन आणि हुसैन कुवार्जेवाला सध्या सजन रे फिर झूठ मत बोलो या कार्यक्रमात एकत्र काम करत आहेत. सजन रे झूठ मत बोलो ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेतील सुमित राघवन, टिकू तलसानिया यांच्या कॉमिक टायमिंगचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेच्या यशानंतर सध्या सजन रे झूठ मत बोलो या मालिकेचा सिक्वल आपल्याला पाहायला मिळत आहे. सजन रे फिर झूठ मत बोलो ही मालिका काहीच दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सजन रे फिर झूठ मत बोलो या मालिकेच्या सेटवर हुसैन आणि राखीच्या जुन्या आठवणींना चांगलाच उजाळा मिळाला. हुसैन आणि राखी यांनी अनेक वर्षांपूर्वी हम पाच या मालिकेत काम केल होते. या मालिकेत राखीने स्वीटी ही भूमिका साकारली होती तर हुसैन या मालिकेत दोन-तीन भागांसाठी पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसला होता. हुसैन हा स्वीटीची लहान बहीण काजलचा मित्र असतो असे आपल्याला पाहायला मिळाले होते. या मालिकेत हुसैनची भूमिका ही काहीच भागांची असली तरी या दोघांनी या मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी खूपच धमाल मस्ती केली होती. याविषयी राखी सांगते, सजन रे फिर झुठ मत बोलो या मालिकेच्या सेटवर भेटल्यावर हम पाचमध्ये आम्ही एकत्र काम केले असल्याचे आम्हाला लगेचच आठवले. गेल्या कित्येक वर्षांमध्ये मी विनोदी मालिकेत काम केले नव्हते. तसेच हुसैनदेखील विनोदी मालिकेत झळकला नव्हता. सजन रे फिर झुठ मत बोलो या विनोदी मालिकेद्वारे आम्ही दोघेही पुन्हा विनोदाकडे वळत आहोत त्यामुळे या भूमिका साकारायला आम्हाला खूप मजा येत आहेत.