Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनय नको रे बाबा - रेमो डिसोझा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2016 16:14 IST

डान्स प्लस या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या टीमसाठीही अनपेक्षित होता. या मालिकेची टीम सध्या दुसऱ्यासिझनसाठी सज्ज झाली असून हा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वेसर्वारेमो डिसोझा याने सीएनक्ससोबत मारलेल्या गप्पा...डान्स प्लस २ या कार्यक्रमाची तयारी कशाप्रकारे सुरू आहे?डान्स प्लस हा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळी या कार्यक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळेल असाआम्ही विचारदेखील केला नव्हता. पण कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. पहिल्या सिझनला मिळालेला प्रतिसाद पाहाता दुसऱ्या सिझनलाआम्हाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याचा अनुभवदेखील आम्हाला मिळाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ऑडिशनच्या आदल्या दिवसापासूनलोक हजारोच्या संख्येने रांगेत उभे राहत होते.रेमो तू डान्स प्लस या कार्यक्रमात सर्वसामान्य लोकांच्या नृत्याचे परीक्षण करतोस, तर झलकदिखला जा या कार्यक्रमात तू सेलिब्रेटींच्या नृत्याचे परीक्षण केले  आहे या दोन्हीमध्ये तूलाकोणता फरक जाणवतो?कोणत्याही सेलिब्रेटीच्या नृत्याचे परीक्षण करताना त्याच्या नृत्यासोबतचत्याचे समाजात असलेले स्टेटस याचाही नक्कीच विचार करावा लागतो. कारण त्या सेलिब्रेटीवरप्रेम करणारे हजारो लोक असतात. आपण काही वाईट बोललो ते सेलिब्रेटीला जरी पटले तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना याचा राग येऊ ...

डान्स प्लस या कार्यक्रमाचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पहिल्या सिझनला प्रेक्षकांनी दिलेला प्रतिसाद हा कार्यक्रमाच्या टीमसाठीही अनपेक्षित होता. या मालिकेची टीम सध्या दुसऱ्यासिझनसाठी सज्ज झाली असून हा सिझन लवकरच सुरू होणार आहे. या कार्यक्रमाचा सर्वेसर्वारेमो डिसोझा याने सीएनक्ससोबत मारलेल्या गप्पा...डान्स प्लस २ या कार्यक्रमाची तयारी कशाप्रकारे सुरू आहे?डान्स प्लस हा कार्यक्रम सुरू झाला, त्यावेळी या कार्यक्रमाला इतकी प्रसिद्धी मिळेल असाआम्ही विचारदेखील केला नव्हता. पण कार्यक्रम सुरू झाल्यावर प्रेक्षकांनी कार्यक्रमाला अक्षरशः डोक्यावर घेतले. पहिल्या सिझनला मिळालेला प्रतिसाद पाहाता दुसऱ्या सिझनलाआम्हाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळणार याची आम्हाला खात्री होती आणि त्याचा अनुभवदेखील आम्हाला मिळाला. तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण ऑडिशनच्या आदल्या दिवसापासूनलोक हजारोच्या संख्येने रांगेत उभे राहत होते.रेमो तू डान्स प्लस या कार्यक्रमात सर्वसामान्य लोकांच्या नृत्याचे परीक्षण करतोस, तर झलकदिखला जा या कार्यक्रमात तू सेलिब्रेटींच्या नृत्याचे परीक्षण केले  आहे या दोन्हीमध्ये तूलाकोणता फरक जाणवतो?कोणत्याही सेलिब्रेटीच्या नृत्याचे परीक्षण करताना त्याच्या नृत्यासोबतचत्याचे समाजात असलेले स्टेटस याचाही नक्कीच विचार करावा लागतो. कारण त्या सेलिब्रेटीवरप्रेम करणारे हजारो लोक असतात. आपण काही वाईट बोललो ते सेलिब्रेटीला जरी पटले तरी त्याच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना याचा राग येऊ शकतो. त्यामुळे खूप विचार करून बोलावे लागते. सामान्य लोकांबद्दल सांगायचे झाले तर अनेक जणांच्या बाबतीत डान्स हे सर्वस्वअसते. त्यामुळे आपल्या एखाद्या प्रतिक्रियेमुळे ते दुखावले जाऊ नयेत याची काळजी घ्यावीलागते. काही जण तर वाईट प्रतिक्रिया मिळाल्या तर नृत्य कायमचे सोडण्याचादेखील विचारकरतात. त्यामुळे कोणाच्याबाबतीतही असे होऊ नये याची काळजी मला परीक्षण करताना घ्यावीलागते. त्यामुळे सामान्य कोणत्याही नृत्याचे परीक्षण करणे हे तितकेच कठीण असते असे मलावाटते.तू फ्लाइंग जट या चित्रपटात झळकणार आहेस, या चित्रपटात तू एका पंजाबी माणसाचीभूमिका साकारत आहेस,  या चित्रपटात काम करण्याचा तुझा अनुभव कसा आहे?मी एबीसीडी या चित्रपटात काम केले असले तरी या चित्रपटात मी एक अभिनेता म्हणूनलोकांसमोर आलो नव्हतो. पण पहिल्यांदाच फ्लाइंग जट या चित्रपटात एक कलाकार म्हणून मी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण केल्यानंतर अभिनय हीसोपी गोष्ट नसते हे माझ्या लक्षात आलेले आहे. त्यातही ही भूमिका एका पंजाबी माणसाचीभूमिका असल्यामुळे भूमिकेच्या भाषेवर, देहबोलीवर मला अधिक मेहनत घ्यावी लागली. एबीसीडी आणि एबीसीडी २ या चित्रपटाच्या यशानंतर प्रेक्षक एबीसीडी ३ ची वाट पाहत आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला केव्हा सुरुवात होणार आहे?एबीसीडी ३ या चित्रपटाच्या चित्रीकरणाला मी लवकरच सुरुवात करणार असून पुढील वर्षी हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा माझा विचार आहे. या चित्रपटाची टीम ही माझ्यासाठी दुसरे कुटुंबच बनली आहे. त्यामुळे यामधील कोणालाही वगळण्याचा मी विचारही करू शकत नाही. त्यामुळे एबीसीडी ३मध्येदेखील माझी जुनी टीमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.