Join us

हाताला सलाईन अन्... ज्ञानदा रामतीर्थकरला काय झालं? फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 10:49 IST

नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ज्ञानदा चाहत्यांना देत असते.

Dnyanada Ramtirthkar Health: ज्ञानदा रामतीर्थकर ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'जिंदगी नॉट आऊट', 'ठिपक्यांची रांगोळी', 'सख्या रे' आणि 'शतदा प्रेम करावे' या मालिकांमधील ती विविध भूमिकेसाठी ओळखली जाते. या मालिकांमधून तिला लोकप्रियता मिळाली. सध्या ती स्टार प्रवाह वाहिनीवरील 'लग्नानंतर होईलच प्रेम' (Lagnanantar Hoilach Prem ) या मालिकेतून झळकत असून तिने या मालिकेमध्ये काव्याची भूमिका साकारली आहे. अशातच ज्ञानदा रामतीर्थकरची प्रकृती सध्या ठीक नसल्याची माहिती समोर आली आहे.  ज्ञानदाने नुकताच तिचा फोटो शेअर करत नेमकं तिच्या प्रकृतीला काय झालं, त्याबद्दल सांगितलं आहे. तसेच ती विश्रांती घेत असून लवकरच नव्या जोमात परतणार असल्याचं तिने सांगितलं.

ज्ञानदा रामतीर्थकरनं हाताला सलाईन लावलेला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबत तिनं लिहलं, "मुंबई लोकल’चं प्रमोशन आहे… ज्ञानदा कुठे आहे? मालिकेचे २०० एपिसोड पूर्ण झाले, सेलिब्रेशनमध्ये ज्ञानदा कुठे आहे? तुमची अप्पू, काव्या म्हणजेच ज्ञानदा सध्या थोडा आराम करतेय. गेले काही दिवस व्हायरल फिव्हरबरोबर ( ताप ) माझं भांडण चालू आहे. पण, लवकरच परत एकदा नवीन एनर्जी घेऊन तुम्हा सर्वांचं मनोरंजन करायला मी येतेय. तुमचं प्रेम, आशीर्वाद माझ्याबरोबर आणि माझ्या सगळ्या प्रोजेक्टबरोबर कायम ठेवाय याची मला खात्री आहे", असं तिनं म्हटलं.  यामध्ये अभिनेत्रीचा चेहरा पाहूनच तिची प्रकृती बिघडल्याचं स्पष्टपणे जाणवत आहे.

ज्ञानदा अभिनयासह सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. ती तिच्या यूट्यूब चॅनेलवरील ब्लॉगमार्फत सेटवरील अपडेट, गमती-जमती चाहत्यांसह शेअर करत असते. दरम्यान,  'लग्नानंतर होईलच प्रेम'  ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. यात सध्या काव्या-पार्थ आणि जीवा-नंदिनी यांनी घटस्फोटासाठी अर्ज केल्याचं पाहायला मिळत आहे. आता पुढच्या सहा महिन्यांत या चौघांचं नातं कोणतं वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :मराठी अभिनेताटिव्ही कलाकारस्टार प्रवाह