जुही परमारला प्रेक्षक कुमकुम म्हणूनच ओळखतात. कुमकुम प्यारा सा बंधन या मालिकेत तिने साकारलेली कुमकुमची भूमिका चांगलीच गाजली होती. तसेच काही वर्षांपूर्वी ती बिग बॉस या कार्यक्रमात देखील झळकली होती. बिग बॉसचे विजेतेपद देखील तिने मिळवले होते. २००९ मध्ये तिने सचिन श्रॉफ सोबत लग्न केले होते. सचिन हा व्यवसायिक असण्यासोबतच छोट्या पडद्यावरचा एक प्रसिद्ध अभिनेता देखील आहे. त्याने सिंदूर तेरे नाम का, नागिन यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
सचिन आणि जुहीच्या लग्नाला आठ वर्षं झाले असून आता ते दोघे घटस्फोट घेणार असल्याचे म्हटले जात आहे. टाइम्स ऑफ इंडिया या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीनुसार ते दोघे गेल्या वर्षभरापासून वेगळे राहात आहेत. जुही आणि सचिनच्या लग्नानंतर सगळे काही सुरळीत सुरू होते. सुरुवातीच्या काळात त्या दोघांचे एकमेकांवर खूपच प्रेम होते. पण गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात दुरावा निर्माण झाला असल्याचे म्हटले जात आहे.
सचिन गेल्या कित्येक दिवसांपासून जुहीसोबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीये. कर्मपाल दाता शनी या कार्यक्रमाच्या लाँचिंगच्या प्रसंगी देखील सचिन अनुपस्थित राहिला होता. एवढेच नव्हे तर जुहीच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटला जुही नेहमीच तिच्या मुलीसोबत फोटो पोस्ट करत असते. पण या फोटोंमध्ये सचिन कधीच दिसत नाही.