राखी लाइमलाइटमध्ये राहाण्याची एकही संधी सोडत नाही. त्यामुळे भारती आणि हर्षच्या लग्नातदेखील तिची उपस्थिती विशेष लक्षवेदी ठरली. हर्ष आणि भारतीच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभाला ती उपस्थित होती. लग्नात ती नृत्य करताना देखील दिसली. तिने तिच्या स्टाईलमध्ये भन्नाट डान्स सादर केला. या सगळ्या डान्समध्ये तिचा नागिन डान्स तर चांगलाच हिट झाला. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर डान्स करतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. राखीच्या या व्हिडिओला अनेक लाइक्स मिळाले असून अनेकांनी यावर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. राखीने या व्हिडिओमध्ये घातलेल्या कपड्यांची देखील चर्चा होत आहे. तिने यात रंगीबेरंगी कपडे घातले आहेत. तसेच कलरफुल गॉगल देखील घातला आहे.
भारती आणि हर्ष दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्या दोघांची ओळख एका रिअॅलिटी शोच्या दरम्यानच झाली होती. हर्ष हा लेखक असून तो देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. लग्नानंतर हे कपल युरोपमध्ये हनीमूनला जाणार आहे. ते दोघे २० ते २५ दिवस युरोपातील वेगवेगळ्या शहरात फिरणार आहेत. भारतीच्या गेस्ट लिस्टमध्ये शाहरुख खान, सलमान खान, करण जौहर, माधुरी दीक्षित, मलायका अरोरा यांसारख्या सेलिब्रिंटींची नावे होती. या सगळ्यांना भारतीने स्वत: जाऊन आमंत्रणं दिली होती.
भारती गेल्या आठ वर्षांपासून छोट्या पडद्यावर काम करत आहे. त्यामुळे तिने लग्नानंतरचा काही काळ केवळ तिच्या पतीसोबत घालवायचा ठरवला आहे. लग्नानंतर एक महिन्यांनी म्हणजेच जानेवारीत ती पुन्हा काम करायला सुरुवात करणार आहे.
Also Read : भारती सिंग व हर्ष लिंबाचियाचे रोमॅन्टिक वेडिंग साँग एकदा पाहाच!!